Breking News
पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील कार्यालयात आगपुण्यात सिमेंट मिक्सर’वाहतुकीला दोन दिवस सवलतशोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडतेआषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद‘तारपा’साठीच आमची वंशावळ-भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावनापुणे जिल्ह्यातील दोन सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्कापोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाणजनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाडिजीटल अटक करण्याची भीती, जेष्ठाला ११ लाखांचा गंडा

पुणे पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह

पुण्यात साडेपाच हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

दुसराच गुन्हा दाखवून विकास लवांडे यांच्या अटकपूर्व जामिनाला विरोध

marathinews24.com

पुणे – पोलिसांच्या अजब कार्यशैलीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, यामुळे पोलिसांच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ज्या व्यक्तीने गुन्हा केलाच नव्हता, त्या गुन्ह्याचा थेट संबंध दाखवून अटकपूर्व जामीन अर्जाला न्यायालयात विरोध केल्याची घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर २०१७ मध्ये बिबवेवाडी पोलीस ठाण्यात प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा नोंदणी क्रमांक ३२/१७ असा होता. परंतु, २०२२ मध्ये राज्य शासनाने हा गुन्हा मागे घेतला होता.

नामनिर्देशन दाखल करतावेळी कार्यपद्धतीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश – सविस्तर बातमी

नुकत्याच झालेल्या न्यायालयीन सुनावणीदरम्यान पोलिसांनी लवांडे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध करण्यासाठी चुकीचा पूर्वइतिहास न्यायालयात सादर केला. बिबवेवाडी पोलीस ठाण्यात २०१७ मध्येच दाखल झालेला पुढील गुन्हा (क्रमांक ३३/१७) हा गौतम कांबळे नावाच्या आरोपीविरुद्ध होता. कांबळेवर दारू पिऊन धिंगाणा घातल्याचा गुन्हा नोंद होता. मात्र, पोलिसांनी न्यायालयात लवांडे यांच्या ३२/१७ या मागे घेतलेल्या गुन्ह्याऐवजी थेट ३३/१७ या क्रमांकाचा उल्लेख केला. यामुळे गौतम कांबळेचा दारू पिऊन धिंगाणा घातल्याचा गुन्हा विकास लवांडे यांच्या नावावर दाखवला गेला.

पोलिसांचे ‘नजरचुकीचे स्पष्टीकरण

गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीस वर्तुळात खळबळ माजली आहे. या सर्व प्रकरणावर आता बिबवेवाडी पोलिसांनी सारवासारव करण्यास सुरुवात केली असून, हा प्रकार केवळ ‘नजरचुकीने’ घडल्याचे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले आहे. तथापि, एखाद्या नागरिकाच्या स्वातंत्र्याशी आणि न्यायाशी संबंधित असलेल्या संवेदनशील प्रकरणांमध्ये पोलीस इतके निष्काळजी कसे असू शकतात, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. न्यायालयाची दिशाभूल करणारी ही ‘नजरचूक’ विकास लवांडे यांच्यासाठी मनस्ताप देणारी ठरली असून, या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी त्यांनी केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×