Breking News
पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील कार्यालयात आगपुण्यात सिमेंट मिक्सर’वाहतुकीला दोन दिवस सवलतशोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडतेआषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद‘तारपा’साठीच आमची वंशावळ-भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावनापुणे जिल्ह्यातील दोन सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्कापोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाणजनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाडिजीटल अटक करण्याची भीती, जेष्ठाला ११ लाखांचा गंडा

मोबाइल विक्री दुकानात चोरी; २० मोबाईल चोरीला

मोबाइल विक्री दुकानात चोरी; २० मोबाईल चोरीला

चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – मोबाइल विक्री दुकानाचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी २० मोबाइल संच, तसेच अन्य साहित्य चोरुन नेल्याची घटना हडपसर-सासवड रस्त्यावरील ऊरळी देवाची परिसरात घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका व्यावसायिकाने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

खासगी कंपनीची बस पाण्यात अडकली – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर-सासवड रस्त्यावरील ऊरळी देवाची येथील बाजारपेठेत व्यावसायिकाचे एस. एस. मोबाइल हे मोबाइल विक्रीचे दुकान आहे. चोरट्यांनी मध्यरात्री दुकानाचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. मोबाइल दुकानातील २० मोबाइल संच, तसेच अन्य साहित्य असा ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला. सहायक पोलसी निरीक्षक कदम तपास करत आहेत. शहर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून ओैषध विक्री, किराणा माल, मिठाई विक्री दुकानांचे कुलूप तोडून रोकड चोरीला जाम्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

टिळक रस्त्यावर दुचाकीच्या धडकेत महिलेचा मृत्यू

दुचाकीच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना टिळक रस्त्यावर घडली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (५ जुलै) पहाटे पाचच्या सुमारास महिला टिळक रस्त्यावरील विजय सेल्स समोरुन निघाली होती. रस्ता ओलांडत असताना भरधाव दुचाकीने महिलेला धडक दिली. अपघातात महिला गंभीर जखमी झाली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेच ओळख पटलेली नाही. ती फिरस्ती असावी, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. सहायक पोलीस निरीक्षक महाले तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×