Breking News
‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटन

व्यावसायिकाकडील रोकड लुटणारे गजाआड

एमडी विक्रीच्या तयारीतील त्रिकुटाला बेड्या

कर्ज फेडण्यासाठी नोकराने लुटमारीचा कट रचल्याचे उघड

marathinews24.com

पुणे – गुलटेकडीतील एका सोसायटीच्या आवारात व्यावसायिकाकडील साडेसहा लाख रुपयांची रोकड लुटून पसार झालेल्या स्वारगेट पोलिसांनी अटक केली. कर्जबाजारी झाल्याने व्यावसायिकाकडे काम करणाऱ्या कामगाराने जावयाशी संगनमत करुन रोकड लुटल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी जयंत रजनीकांत शहा (वय ५९), सोहेल अलीअहमद खान (वय ३५) , तौसीफ मुकीद बागवान (वय ३०) यांना अटक करण्यात आली. याबाबत एका व्यावसायिकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पोलीस इन्स्पेक्टर बोलत असल्याची बतावणी- सविस्तर बातमी 

तक्रारदार व्यावसायिक हे गुलटेकडीतील एका सोसायटीत राहायला आहेत. ९ जुलै रोजी ते रात्री आठच्या सुमारास घरी आले. सोसायटीच्या प्रवेशद्वारावर ते पोहोचले. तेव्हा त्यांनी रोकड असलेली पिशवी रखवालदाराकडे ठेवण्यास दिली. व्यावसायिक आणि रखवालदार सोसायटीच्या आवारातून निघाले. तेव्हा त्यांच्या मागावर असलेल्या चोरट्यांनी साडेसहा लाख रुपयांची रोकड असलेली पिशवी हिसकावून नेली होती. काही अंतरावर लावलेल्या दुचाकीवरुन चोरटे पसार झाले.

स्वारगेट पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. १५० ते १६०० ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासून चोरट्यांचा माग काढण्यात आला. आरोपी शहा हा तक्रारदार व्यावसायिकाकडे कामाला होता. शहाने कर्ज घेतले होते. कर्जबाजारी झाल्यानंतर शहा यांनी जावई सोहेल आणि त्याचा मित्र तौसीफ याला हाताशी धरून रोकड लुटण्याचा कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाले. परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम, हवालदार नाना भांदुर्गे, सागर केकाण, सुजय पवार, अश्रुबा मोराळे, हर्षल शिंदे, प्रशांत टोणपे, सागर काळे, संग्राम शिंदे, रमेश चव्हाण, अनिता घायतडक यांनी ही कामगिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×