Breking News
‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटन

धक्कादायक…प्रेमाच्या आमिषाने तरुणीवर अत्याचार

धक्कादायक...प्रेमाच्या आमिषाने तरुणीवर अत्याचार

पुण्यात चौघांवर गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – प्रेमसंबंधाचे आमिष दाखवून २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने स्वतःसह आपल्या मित्र आणि लहान भावाकडूनही तरुणीवर अत्याचार करून त्याचे व्हिडिओ चित्रीत केले. तसेच ते व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. याप्रकरणी फरहान रिझवान शेख, फजल शेख, रेहान रिझवान शेख आणि साहिल यांच्याविरुद्ध बलात्कार, धमकी व अन्य संबंधित कलमांनुसार विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पुण्यातील नवले पुलाजवळ धावत्या इलेक्ट्रिक कारला आग – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्रांतवाडी परिसरात राहणाऱ्या २१ वर्षीय तरुणी २०२४ मध्ये महाविद्यालयात शिक्षण घेत होती. त्यावेळी तिची आरोपी फरहान रिझवान शेख (रा. मुंढवा) याच्याशी ओळख झाली. सोशल मीडियावरून दोघांमध्ये संवाद सुरू झाला. नोव्हेंबर २०२५ मध्ये फरहानने प्रेमाची बतावणी करून तरुणीला वाघोलीतील एका मित्राच्या रूमवर नेले. तेथे तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर फरहानने वेगवेगळ्या बहाण्याने तरुणीला वारंवार बोलावून तिच्यावर अत्याचार केले. तसेच त्याचा मित्र फजल शेख, लहान भाऊ रेहान शेख आणि नंतर साहिल नावाच्या तरुणाकडूनही तिच्यावर लैंगिक अत्याचाराला प्रवृत्त केले.

घटनांचे व्हिडिओ चित्रीत करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे. तसेच डिसेंबर २०२५ मध्ये आजारी असल्याचे खोटे सांगून खराडी येथील फ्लॅटवर बोलावून त्याने पुन्हा अत्याचार केला. त्यानंतर आरोपीकडून पीडितेला सतत संपर्क साधण्याचा प्रयत्न होत असल्याने तिने त्याच्याशी संबंध तोडले. मात्र जून २०२६ मध्ये पुन्हा माफी मागण्याच्या बहाण्याने तिला लॉजवर नेले. तेथे साहिल नावाच्या व्यक्तीने तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादी तरुणी केला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×