Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

हडपसरमधील घरफोडीचा पोलिसांनी लावला छडा

हडपसरमधील घरफोडीचा पोलिसांनी लावला छडा

उत्तर प्रदेशातील चोरटा गजाआड

marathinews24.com

पुणे – हडपसर भागातील एका सोसायटीतील झालेल्या घरफोडीचा छडा पोलिसांनी २४ तासात लावला. दागिने चोरुन पसार झालेल्या उत्तर प्रदेशातील चोरट्याला हडपसर परिसरातून अटक करण्यात आली.फैजल इसरार खान (वय १८, रा. ढकाई, कोशांबी, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. हडपसरमधील सम्राट गार्डन सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून सोनसाखळी, कर्णफुले असे साडेतीन लाख रुपयांचे दागिने चोरून नेण्यात आल्याची घटना नुकतीच घडली होती. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. २३ जुलै रोजी घरफोडीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली होती.

सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हजतर्फे आयोजित रक्तदान शिबिरात १०२ पिशव्यांचे संकलन – सविस्तर बातमी 

पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले होते. घरफोडी करणारा चोरटा हडपसरमधील माळवाडी भागात थांबल्याची माहिती तपास पथकातील पोलीस कर्मचारी कुंडलिक केसकर, तुकाराम झुंजार, महावीर लोंढे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून खान याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून साडेतीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.परिमंडळ सहाचे पोलीस उपायुक्त जीवन बेनीवाल, सहायक आयुक्त अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक नीलेश जगदाळे, सहायक निरीक्षक विजय पाटील, पोलीस कर्मचारी दीपक कांबळे, नीलेश किरवे, भाऊसाहेब कटके, विजय कोनकर, अजित मदने, भगवान हंबर्डे, अनिरुद्ध साेनवणे, महेश चव्हाण यांनी ही कामगिरी केली.

पादचारी तरुणाला मारहाण करुन लुटले

पादचारी तरुणाला मारहाण करुन त्याच्या गळ्यातील पावणेचार लाखांची सोनसाखळी चोरट्यांनी लुटून नेण्यात आल्याची घटना विश्रांतवाडी भागात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका तरुणाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण विश्रांतवाडीतील सिद्धेश्वरनगर भागात राहायला आहे. शनिवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास तक्रारदार तरुण विश्रांतवाडीतील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघाला होता. त्या वेळी एकाने तरुणााला अडवले. त्याला शिवीगाळ केली. तरुणाला मारहाण करुन त्याच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेली. चोरट्याने केलेल्या मारहाणीत तरुणाला दुखापत झाली. चोरट्याने लुटलेल्या सोनसाखळीची किंमत तीन लाख ७० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत लोहकरे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×