Breking News
पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील कार्यालयात आगपुण्यात सिमेंट मिक्सर’वाहतुकीला दोन दिवस सवलतशोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडतेआषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद‘तारपा’साठीच आमची वंशावळ-भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावनापुणे जिल्ह्यातील दोन सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्कापोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाणजनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाडिजीटल अटक करण्याची भीती, जेष्ठाला ११ लाखांचा गंडा

पुण्यात सिमेंट मिक्सर’वाहतुकीला दोन दिवस सवलत

पुण्यात सिमेंट मिक्सर’वाहतुकीला दोन दिवस सवलत

वाहतूक पोलिसांच्या परवानगीची गरज नाही

marathinews24.com

पुणे – सिमेंट मिक्सर वाहनांना (आरएमसी) वाहनांना वाहतूक पोलिसांच्या परवानगीशिवाय सकाळी वाहतुकीस परवानगी देण्यात आली आहे. येत्या शनिवारी (१ ऑगस्ट) आणि रविवारी (२ ऑगस्ट) सिमेंट मिक्सर वाहनांना सकाळी सहा ते सायंकाळी पाच या वेळेत वाहतूक पोलिसांच्या परवानगीशिवाय वाहतुकीस परवानगी देण्यात आली.

पुणे जिल्ह्यातील दोन सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्का – सविस्तर बातमी 

‘शहरातील वाहतूक कोंडी, तसेच अपघातांच्या पार्श्वभूमीवर शहरातील महत्त्वाचे रस्ते, तसेच मध्यभागात बांधकाम क्षेत्राशी संबंधित वाहनांना मनाई करण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांनी निश्चित केलेल्या भागातून जाण्यास परवानगी आवश्यक असते. १ आणि २ ऑगस्ट रोजी सकळी सहा ते सायंकाळी पाच यावेळेत आरएमसी वाहनांना शहरात प्रवेश करण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसंच्या परवानगीची आवश्यकता नाही’, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डाॅ. संदीभ भाजीभाकरे यांनी कळविले आहे.

‘संबधित निर्णय प्रायोगिक तत्त्वावर घेण्यात आला आहे. वाहतुकीची परिस्थिती, तसेच सार्वजनिक हित विचारात घेऊन या निर्णयात बदल केला जाऊ शकतो. सिमेंट मिक्सर वाहन चालक, ठेकेदारांनी वाहतूक नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी’, असे आवाहन करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×