Breking News
पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील कार्यालयात आगपुण्यात सिमेंट मिक्सर’वाहतुकीला दोन दिवस सवलतशोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडतेआषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद‘तारपा’साठीच आमची वंशावळ-भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावनापुणे जिल्ह्यातील दोन सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्कापोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाणजनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाडिजीटल अटक करण्याची भीती, जेष्ठाला ११ लाखांचा गंडा

पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील कार्यालयात आग

पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील कार्यालयात आग

रुंदीकरणासाठी नियंत्रित ब्लास्टिंग; वाहनचालकांना बोपदेव घाट मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

marathinews24.com

पुणे – पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एक परिसरातील असलेल्या इमारतीतील टेलिकाॅम कार्यालयात आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाची मदत घटनास्थळी पोहोचेपर्यंत रेल्वे कर्मचाऱ्यांनी अग्निरोधक यंत्राचा वापर करून आग आटोक्यात आणली.

पुण्यात सिमेंट मिक्सर’वाहतुकीला दोन दिवस सवलत – सविस्तर बातमी 

पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एकवरील इमारतीत टेलिकाॅम कार्यालय आहे. तेथील पॅनेलमधून दुपारी चारच्या सुमारास धूर येत असल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला कळविण्यात आली. अग्निशमन दलाच्या कै. दयाराम राजगुरु केंद्रातील बंब घटनास्थळी रवाना झाला. सुरक्षेच्या कारणास्तव विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला. रेल्वे कर्मचाऱ्यांनी अग्निरोधक उपकरणाचा (फायर एक्स्टिंगुशर) वापर करून आग नियंत्रणात आणली. विद्युत पॅनेलमध्ये आग लागल्याने मोठ्या प्रमाणावर धूर निर्माण झाला होता.अग्निशमन दलातील तांडेल विजय चौरे, ओंकार ताठे, बाळा गव्हाणकर, जयेश गाताडे, सागर जाधव, सुरेश घुगे यांनी तातडीने इमारतीत प्रवेश केला. टेलिकाॅम कार्यालयाची पाहणी केली. आग पूर्णपणे नियंत्रणात आल्याची खातरजमा करण्यात आली. त्यानंतर जवानांनी टेलिकाॅम कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सुरक्षेबाबत सूचना दिल्या, अशी माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांनी दिली.

दिवे घाट आज दुपारी १२ ते २ बंद

दिवे घाटाचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. मंगळवारी (२८ जुलै) दुपारी बारा ते दोन या वेळेत दिवे घाटातील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले.

‘दिवे घाटातील रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. रुंदीकरणासाठी डोंगर कपारीत नियंत्रित स्फोट (ब्लास्टिंग टेक्नोलाॅजी) घडविण्यात येतात. मंगळवारी दुपारी बारा ते दुपारी दोन या वेळेत दिवे घाटाचे रुंदीकरणाचे काम करण्यात येणार आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दिवे घाटातील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे,’ अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डाॅ. संदीप भाजीभाकरे यांनी दिली.

‘पुणे ते सासवड, सासवड ते पुणेदरम्यान प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी शक्यतो दुपारी दोन तास प्रवास टाळावा. वाहनचालकांनी बोपदेव घाट मार्गाचा वापर करावा. कोंढव्यातील बोपदेव घाट मार्गे पुणे-सासवडकडे जावे’, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×