Breking News
फॉरेक्स ट्रेडींगच्या बहाण्याने तरुणाची ४७ लाखांची फसवणूकराँग साइड वाहनचालकांवर कठोर कारवाई करा; सकाळीही ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ तपासणी राबवा : डॉ. नीलम गोऱ्हेसीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या सुधारित शुल्क रचनेमुळे विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क परताव्याचा अधिकाधिक लाभडेक्कनमधील फ्लाईंग कॅफे मालकासह दोघांना अटकबालिका अत्याचारासह हत्या; दोषींविरुद्ध फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवणारशासकीय नोकरीच्या आमिषाने महिलेची २४ लाखांची फसवणूकपुण्यात तिकिट विक्री केंद्रात रेल्वे कर्मचाऱ्यावर चाकूने वार; रोकड लुटलीअल्पवयीन मुलीवर अत्याचारानंतर हत्या; पुणे जिल्ह्यातील पिंपळवंडी गावातील घटनावाहतूक नियमन करा, कारवाईची मशिन दिवाळीपर्यंत बंद ठेवाहिंदू सणांवरील निर्बंधांविरोधात शिवसेना आक्रमक

पुण्यातील बालसुधारगृहातून पळालेला अल्पवयीन ताब्यात

पुण्यातील बालसुधारगृहातून पळालेला अल्पवयीन ताब्यात

फुस लावणारे दोघे अटकेत

marathinews24.com

पुणे – येरवड्यातील पंडीत जवाहरलाल नेहरु उद्योग केंद्रातून पसार झालेल्या अल्पवयीनासह तिघांना बिबवेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मार्वेâटयार्ड-गंगाधाम रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. पृथ्वी दीपक श्रीवास्तव (वय १८, रा. श्रीनगर, जि. गोंदिया), प्रेम एकनाथ जाधव (वय १८, रा. छत्रपती संभाजीनगर) यांना अटक केली आहे.

पुण्यात जेष्ठाला गुंतवणूकीची हाव पडली महागात – सविस्तर बातमी 

बाल न्याय मंडळाच्या आदेशाने गंभीर गुन्ह्यांतील अल्पवयीनांना पंडीत जवाहरलाल नेहरु उद्योग केंद्रात (बालसुधारगृहात) ठेवण्यात येते. १३ ऑगस्टलाा बालसुधारगृहातून रात्रा ६ अल्पवयीन पसार झाले होते. याप्रकरणाचा पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. त्यापैकी अल्पवयीन आणि त्याला फूस लावणारे श्रीवास्तव, जाधव हे मार्वेâटयार्ड-गंगाधाम रस्त्यावरील चहा विक्री टपरीजवळ थांबल्याची माहिती बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून तिघांना ताब्यात घेतले.

श्रीवास्तव आणि जाधव यांना गुन्ह्यात अल्पवयीन असताना ताब्यात घेतले होते. दोघांचे वय १८ वर्ष झाल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने येरवडा कारागृहात रवानगी करण्यात येणार होती. मात्र, तत्पुर्वी दोघांनी अल्पवयीनाला फूस लावून १३ ऑगस्टला रात्री ते सुधारगृहातून पसार झाले होते. ही कामगिरी पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते, पोलीस निरीक्षक सूरज बेंद्रे, उपनिरीक्षक मालोजी कांबळे, संजय गायकवाड, अय्याज दड्डीकर, विनोद जाधव, सुमित ताकपेरे, आशिष गायकवाड, आकाश कसबे, रक्षित काळे, शिवाजी येवले, राहुल खाडे यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×