Breking News
फॉरेक्स ट्रेडींगच्या बहाण्याने तरुणाची ४७ लाखांची फसवणूकराँग साइड वाहनचालकांवर कठोर कारवाई करा; सकाळीही ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ तपासणी राबवा : डॉ. नीलम गोऱ्हेसीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या सुधारित शुल्क रचनेमुळे विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क परताव्याचा अधिकाधिक लाभडेक्कनमधील फ्लाईंग कॅफे मालकासह दोघांना अटकबालिका अत्याचारासह हत्या; दोषींविरुद्ध फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवणारशासकीय नोकरीच्या आमिषाने महिलेची २४ लाखांची फसवणूकपुण्यात तिकिट विक्री केंद्रात रेल्वे कर्मचाऱ्यावर चाकूने वार; रोकड लुटलीअल्पवयीन मुलीवर अत्याचारानंतर हत्या; पुणे जिल्ह्यातील पिंपळवंडी गावातील घटनावाहतूक नियमन करा, कारवाईची मशिन दिवाळीपर्यंत बंद ठेवाहिंदू सणांवरील निर्बंधांविरोधात शिवसेना आक्रमक

हिंदू सणांवरील निर्बंधांविरोधात शिवसेना आक्रमक

हिंदू सणांवरील निर्बंधांविरोधात शिवसेना आक्रमक

उत्सवांवर बंधने लादण्याचा प्रयत्न; निर्णय मागे न घेतल्यास आंदोलनाचा इशारा

marathinews24.com

पुणे – हिंदू धर्माच्या पारंपरिक सण-उत्सवांवर अनावश्यक निर्बंध लादून धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांना गालबोट लावण्याचा प्रयत्न सहन करणार नाही, असा इशारा शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने देण्यात आला आहे. यासंदर्भात शिष्टमंडळाने पोलिस उपायुक्त कृषीकेश रावले यांची भेट घेऊन निवेदन दिले. निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे.

पुण्यातील बालसुधारगृहातून पळालेला अल्पवयीन ताब्यात – सविस्तर बातमी 

गणेश पेठ परिसरातील ऐतिहासिक दगडी नागोबा उत्सवाच्या निमित्ताने नागपंचमीच्या दिवशी पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे नागरिक, उत्सव मंडळे आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे पेठांमधील गणेशोत्सव मंडळे, दहीहंडी आणि अन्य हिंदू उत्सव मंडळांमध्येही असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. हिंदूंच्या सण-उत्सवांनाच वारंवार नियमांच्या नावाखाली लक्ष्य केले जाणार असेल, तर हा दुजाभाव शिवसेना सहन करणार नाही, असा इशारा दिला.

पुणे ही गणेशोत्सवाची सांस्कृतिक राजधानी असून सार्वजनिक गणेशोत्सवाला १०० वर्षांहून अधिक काळाची परंपरा आहे. त्यामुळे उत्सवांवर अनावश्यक बंधने लादण्याऐवजी प्रशासनाने परंपरा, श्रद्धा, नागरिकांची भावना आणि कायदा-सुव्यवस्था यांचा समतोल राखून निर्णय घ्यावा, अशी शिवसेनेची भूमिका आहे. तसेच पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून आयोजित केलेल्या उत्सव विषयक बैठकीत शिवसैनिकांनी पोलिस प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध नोंदविला. यावेळी फरासखाना पोलीस ठाण्याबाहेर सरकारसह प्रशासनाच्या भूमिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

पोलिस प्रशासनाने निर्णयाचा तातडीने पुनर्विचार करून तो मागे घेतला नाही, तर शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळे, दहीहंडी मंडळे आणि हिंदू उत्सव मंडळांना एकत्रित करून पोलिस आयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेच्यावतीने देण्यात आला आहे. यावेळी शिवसेना पुणे शहराचे शहर संघटक राजेंद्र शिंदे, युवासेना शहर अध्यक्ष युवराज पारिख, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, विभाग प्रमुख चंदन साळुंके, परेश खांडके, सोहम जाधव, महिला आघाडीच्या रेखा कोंडे, नागेश खडके, संदीप गायकवाड, प्रतीक आल्हाट, सुनील गायकवाड, अमर काची, अक्षय कालेकर, अमित जाधव, प्रथमेश भुकम यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×