एटीएसकडून पुणे जिल्ह्यातील ओतूरमध्ये कारवाई
marathinews24.com
पुणे – अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या दोन बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) यश आले आहे. दोन्ही नागरिक आपली ओळख लपवून राहत असल्याचे उघडकीस आले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या मदतीने ओतूर परिसरात ही कारवाई करण्यात आली. दोघेही बांगलादेशमधील मूळ रहिवासी असल्याचे उघड झाले आहे.
पुणेकरांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा सज्ज, नियंत्रण कक्षही सुसज्ज – सविस्तर बातमी
ताजमीर मोश्ताफा अन्सारी (वय २९) आणि मोहम्मद अलिमूल गुलाम अन्सारी (वय २८) अशी अटक केलेल्या बांगलादेश नागरिकांची नावे आहेत. ते मूळचे बांगलादेशमधील बोकराई जिल्ह्यातील शारखीरा येथील रहिवासी आहेत. दोघेही काही काळापासून पुणे जिल्ह्यातील ओतूरमध्ये अवैधरित्या वास्तव्य करत होते. एटीएस पथकाला मिळालेल्या माहितीनंतर कारवाई करण्यात आली. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, आरोपींचे भारतात येण्याचा मार्ग कोणता होता. त्यांचा अन्य कोणाशी संपर्क होता का, याची चौकशी सुरु आहे, अशी माहिती महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने दिली आहे.