सलग दोन दिवस सीसीटीव्ही चित्रीकरण तपासल्यानंतर पिशवीचा शोध
marathinews24.com
पुणे – किराणा माल व्यापाऱ्याकडील अडीच लाखांची रोकड असलेली पिशवी पोलिसांच्या प्रयत्नांमुळे सापडली. पोलिसांनी सलग दोन दिवस कात्रज-कोंढवा रस्त्यावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासून पिशवीचा शोध घेतला आणि व्यापाऱ्याला रोकड असलेली पिशवी परत (Kondhwa Cash Recovery) केली. रोकड सापडल्याने व्यापाऱ्याने पोलिसांचे मनोमन आभार मानले. कोंढव्यातील येवलेवाडी भागात किराणा माल व्यापारी राहायला आहे. व्यापाऱ्याचे येवलेवाडी भागात किराणा माल विक्रीचे दुकान आहे. १६ सप्टेंबर रोजी मार्केट यार्डातील भुसार बाजारात खरेदीसाठी निघाले होते.
नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू – सविस्तर बातमी
व्यापाऱ्याने पिशवीत अडीच लाखांची रोकड, (Kondhwa Cash Recovery) तसेच अडीच लाखांचे स्वाक्षरी केलेले धनादेश ठेवले होते. ही रक्कम मार्केट यार्डातील एका व्यापाऱ्याला द्यायची होती. दुचाकीवरुन जात असताना रोकड आणि धनादेश ठेवलेली पिशवी वाटेत पडली. पिशवी गहाळ झाल्यानंतर किराणा माल व्यापाऱ्याने कोंढवा बुद्रुक येवलेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती पाटील, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दीपक कारंडे यांनी तपास पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांना गहाळ झालेल्या पिशवीचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी कात्रज-कोंढवा रस्त्यावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले.
पोलिसांनी सलग दोन दिवस या भागातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. तेव्हा कोंढव्यातील व्यंकटेश गॅलेक्सी सोसायटीच्या परिसरात किराणा माल व्यापाऱ्यांकडील रोकड असलेली पिशवी पडल्याचे चित्रीकरणात दिसून आले. ही पिशवी एका वाटेसरुच्या नजरेस पडली. वाटसरु ही पिशवी घेऊन घरी घेऊन गेला. पोलिसांनी वाटसरुची माहिती घेण्यास सुरुवात केली. तेव्हा वाटसरु एका जवळच्या सोसायटीत राहत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी वाटसरुचा शोध घेतला. त्याच्याकडे घरी पोलीस गेले.
गहाळ झालेल्या पिशवीबाबत माहिती त्याला देण्यात आली. वाटसरुकडून रोकड ठेवलेली पिशवी ताब्यात घेण्यात आली. रोकड ठेवलेली पिशवी आणि धनादेश किराणा माल व्यापाऱ्याला परत (Kondhwa Cash Recovery) करण्यात आली. किराणा माल व्यापाऱ्याला अडीच लाखांची रोकड आणि धनादेश परत करण्यात आला. व्यापाऱ्याने पोलिसांचे आभार मानले. त्याने कृतज्ञता व्यक्त केली.
परिमंडळ पाचच्या पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सहायक आयुक्त रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती पाटील, पोलीस निरीक्षक दीपक कारंडे, महेश बेदुगुडे, अभिजित जाधव, अभिजित रत्नपारखी, गणेश चिंचकर, लक्ष्मण होळकर, अनिल बनकर, किशोर पवार, मयूर मोरे, रुपेश पाटील, सुजित मदने, विजय खेंगरे यांनी ही कामगिरी केली.






















