Breking News
Market Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरासLokSamvad 2026 : रक्तदान केल्याने गरजू रुग्णाला जीवदान तर रक्तदान दात्याच्या आरोग्यालाही अनेक फायदे – डॉ. विद्या राठोडBibwewadi Crime : कार मागे घेण्यास सांगितल्याच्या वादातून तरुणावर हल्ला‘Bappa.org’ च्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सवाच्या परंपरा जगासमोर आणाMundhwa Drug Smuggler : अमली पदार्थ तस्कर महिला वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्धPune Crime News : श्वान मालक महिलेच्या अंगावर मोटार घालून खुनाचा प्रयत्नUrban Poor Health Scheme : लोकसंवाद-२०२६’मधून महापालिकेच्या आरोग्य योजनांची जनजागृतीSadashiv Peth Dog Death : मारहाण केल्याने श्वानाचा मृत्यूKondhwa Cash Recovery : पोलिसांच्या प्रयत्नांमुळे व्यापाऱ्याची अडीच लाखांची रोकड सापडलीSports Schemes Pune : क्रीडा विभागाच्या विविध योजनांचा युवकांनी लाभ घ्यावा; राज्यात अनेक क्रीडापटू घडवू या

Mundhwa Drug Smuggler : अमली पदार्थ तस्कर महिला वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध

Mundhwa Drug Smuggler

मुंढवा पोेलिसांची कारवाई

marathinews24.com

पुणे – अमली पदार्थ तस्करी प्रकरणात वेळोवेळी कारवाई केल्यानंतर वर्तणुकीत सुधारणा न झाल्याने अमली पदार्थ तस्कर (Mundhwa Drug Smuggler) महिलेविरुद्ध मुंढवा पोेलिसांनी ‘पीआयटी एनडीपीएस’ कायद्यातील तरतुदींच्या आधारे कठोर कारवाई केली. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या आदेशाने अमली पदार्थ तस्कर महिलेला वर्षभरासाठी कोल्हापूरातील कळंब मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

श्वान मालक महिलेच्या अंगावर मोटार घालून खुनाचा प्रयत्न – सविस्तर बातमी 

रिना रवी गुमाने (वय ३२) असे कारवाई केलेल्या अमली पदार्थ तस्कर महिलेचे नाव आहे. मुंढवा पोलिसांनी अमली पदार्थ तस्करी आणि विक्री प्रकरणात रिना हिच्याविरुद्ध २०२२ मध्ये अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये (एनडीपीएस) गु्न्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात तिने पुण्यातील सत्र न्यायालयाकडून ८ ऑगस्ट २०२२ रोजी जामीन मिळविला होता. जामीन मंजूर केल्यानंतर तिने पुन्हा अमली पदार्थ विक्री सुरू केली. मुंढवा पोलिसांनी गेल्या १९ मे रोजी रोजी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात तिने अतिरिक्त सत्र न्यायालयाकडून जामीन मिळवला होता.

न्यायालयाने तिला अटी आणि शर्तींवर जामीन मंजूर केला होता. मात्र, रिना हिच्या वर्तणुकीत सुधारणा झाली नसल्याचे दिसून आले. ती पुन्हा अमली पदार्थ विक्री, तस्करीत (Mundhwa Drug Smuggler) सामील असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर तिच्याविरुद्ध कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. रिनाला वर्षभरासाठी ‘पीआयटी -एनडीपीएस’ कायद्यान्वये कारागृहात स्थानबद्ध करावे, असा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

या प्रस्तावाला पोलीस महासंचालकांनी मंजुरी दिली. त्यानंतर पोलीस आयुक्तांच्या आदेशाने तिला कोल्हापूरातील कळंब कारागृहात वर्षभरासाठी स्थानबद्ध करण्यात आले. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त जीवन बेनीवाल, सहायक आयुक्त अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनीक, गुन्हे शाखेचे निरीक्षक सागर गोडे, सहायक निरीक्षक गणेश पिंगुवाले, उपनिरीक्षक युवराज पोमण, केतकी चव्हाण, प्रमोद काळे, संभाजी शितोळे, सचिन बोराटे, रुपेश तोडेकर, तेजस जगदाळे, रुपेश महामुनकर, सारिका पखाले, विशाल बनकर, ऋषीकेश टिळेकर, अक्षय जराड यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×