Breking News
MLC Election 2026 : विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदानBaramati Wastewater Reuse : बारामतीत सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापरPune News : पुण्यात २२ ऑक्टोबरला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्रPune Assault Cases : महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; कोरेगाव पार्कमधील घटनाPune Post Office : टपाल विभागाच्यावतीने २७ ऑक्टोबरला पेन्शन अदालतीचे आयोजनYerawada Drainage Pit Death Case : येरवड्यात खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यूPune Fodder Production Plan : पुणे जिल्ह्यात २५ हजार एकरांवर चारा उत्पादनाचे नियोजनPune Police : पुण्यातील १० गुन्हेगारांना तडीपारीचा दणकाPune Water Scarcity Action Plan : संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी त्रैमासिक कृती आराखडा तातडीने सादर करा – अमित पाथरवटPune Cyber Crime : पेन्शनकार्ड नोंदणीची बतावणी, जेष्ठाला ५ लाखांचा गंडा

Pune Share Trading Fraud : शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूकीचे आमिष तरुणाच्या अंगलट

Pune Share Trading Fraud

पुण्यात तब्बल ६६ लाखांचा ऑनलाईन गंडा

marathinews24.com

पुणे – Pune Share Trading Fraud : शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी तरूणाला तब्बल ६६ लाखांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना १९ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर २०२६ कालावधीत हडपसरमध्ये घडली आहे. याप्रकरणी ३७ वर्षीय तक्रारदाराने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, बँकखातेधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सायबर चोरट्याची चलाखी अन कंपनीने गमावले ७ लाख रुपये – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण हडपसरमध्ये राहायला असून, १९ ऑगस्टला सायबर चोरट्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. व्हॉटसअ‍ॅप, टेलीग्रामसह इतर माध्यमातून सायबर चोरट्यांनी तरुणाला संपर्काद्वारे विश्वास संपादित केला. (Pune Share Trading Fraud) शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो, अशी बतावणी सायबर चोरट्यांनी केली. सुरवाताली काही रक्कम गुंतवणूक केल्यानंतर त्यांना सायबर चोरट्यांनी परतावा दिला. गुंतवणूक केलेल्या रकमेवर परतावा मिळत असल्यामुळे तरुणाला विश्वास बसला.

काही दिवसांनी तक्रारदाराने गुंतवणूकीत वाढ केली. आरोपींनी आमिष दाखवल्यानंतर तरुणाने गुंतवणूकीला प्राधान्य दिले. अवघ्या काही दिवसांत तब्बल ६६ लाख १५ हजार रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, त्यांनी परतावा मागितला असता, सायबर चोरट्यांनी टाळाटाळ करण्यास सुरूवात केली. वारंवार तगादा लावूनही पैसे न मिळाल्यामुळे फसवणूक झाल्याचे तरुणाच्या लक्षात आले. १८ दिवसांत लाखो रुपयांची फसवणूक झाल्यामुळे तरुणाने तत्काळ सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे तपास करीत आहेत.

गुंतवणूकीवरील आमिष आर्थिक फसवणूकीचे जाळे

नागरिकांनो, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीच्या नावाने तुम्हाला जर कोणी आमिष दाखवत असेल, तर संबंधित पासून दूर राहा. त्यांच्यासोबत कसलाही संवाद, संपर्क न करता बोलणे टाळा. अन्यथा विविध आमिष, जादा परताव्याच्या नावाखाली तुमच्याकडील लाखो रुपये वर्ग करून फसवणूक केली जाउ शकते. त्यामुळे अशा सायबर फसवणूकीच्या जाळ्यात न अडकता, अनोळखी लोकांसोबत ऑनलाईनरित्या व्यवहार न करण्याचे आवाहन पुणे सायबर पोलिसांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×