Breking News
MLC Election 2026 : विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदानBaramati Wastewater Reuse : बारामतीत सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापरPune News : पुण्यात २२ ऑक्टोबरला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्रPune Assault Cases : महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; कोरेगाव पार्कमधील घटनाPune Post Office : टपाल विभागाच्यावतीने २७ ऑक्टोबरला पेन्शन अदालतीचे आयोजनYerawada Drainage Pit Death Case : येरवड्यात खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यूPune Fodder Production Plan : पुणे जिल्ह्यात २५ हजार एकरांवर चारा उत्पादनाचे नियोजनPune Police : पुण्यातील १० गुन्हेगारांना तडीपारीचा दणकाPune Water Scarcity Action Plan : संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी त्रैमासिक कृती आराखडा तातडीने सादर करा – अमित पाथरवटPune Cyber Crime : पेन्शनकार्ड नोंदणीची बतावणी, जेष्ठाला ५ लाखांचा गंडा

Green Solution Research Agreement : ‘ग्रीन सोल्यूशन’ व चेक प्रजासत्ताकातील ‘रिसर्च सेंटर’मध्ये सामंजस्य करार

Green Solution Research Agreement

आंतरराष्ट्रीय संशोधन व तंत्रज्ञान सहकार्याच्या माध्यमातून मिळणार विकासाला चालना; सागर अहिवळे यांची माहिती

marathinews24.com

पुणे – Green Solution Research Agreement : पुण्यातील ग्रीन सोल्यूशन इंडस्ट्रीज आणि चेक प्रजासत्ताकातील इंटरनॅशनल न्यूरोडिजेनेरेटिव्ह डिसऑर्डर्स रिसर्च सेंटर (आयएनडीआरसी) यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. मुंबईत झालेल्या कार्यक्रमात चेक प्रजासत्ताकाचे उपपंतप्रधान आणि उद्योग व व्यापार मंत्री कॅरिल हॅवलीसेक, तसेच महाराष्ट्राचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. आंतरराष्ट्रीय संस्थात्मक सहकार्य अधिक दृढ करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या करारामुळे भारतीय औद्योगिक समूह आणि चेक संशोधन संस्था यांच्यात अनुभवांची देवाणघेवाण सुलभ करणे तसेच वैज्ञानिक, तांत्रिक आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण मूल्य निर्माण करणे शक्य होणार आहे.

पुणे जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागांतील पीक नुकसानीचे ८० टक्के पंचनामे पूर्ण; रविवारपर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट – सविस्तर बातमी 

या उपक्रमात दोन्ही संस्थांशी संबंधित प्रतिनिधींनी कराराचे आदानप्रदान केले. यामध्ये ग्रीन सोल्यूशन इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक सागर अहिवळे, ‘आयएनडीआरसी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक डॉ. वित दोचकाल, सदस्य प्रा. व्हॅक्लाव स्नाशेल, संचालक क्लारा यांचा समावेश आहे. प्राग येथे मुख्यालय असलेली व २०२१ मध्ये स्थापन झालेली इंटरनॅशनल न्यूरोडिजनरेटिव्ह डिसऑर्डर्स रिसर्च सेंटर ही एक ना-नफा संशोधन संस्था आहे. वैज्ञानिक संशोधन आणि आंतरविद्याशाखीय सहकार्याच्या माध्यमातून अल्झायमर रोगासह मज्जासंस्थेच्या ऱ्हासाशी संबंधित विकारांचे आकलन, त्यांचे लवकर निदान, प्रतिबंध आणि उपचार यांमध्ये विकास करणे हे या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

सामंजस्य करारांतर्गत, ग्रीन सोल्यूशन आणि आयएनडीआरसी सहकार्याच्या विविध संधींचा शोध घेणार आहेत. यामध्ये संयुक्त संशोधन उपक्रम, प्रायोगिक प्रकल्प, तंत्रज्ञान विकास, संबंधित माहिती व तज्ज्ञतेची देवाणघेवाण, तसेच कार्यशाळा, चर्चासत्रे, परिषदा आणि ज्ञानाची देवाणघेवाण करणाऱ्या इतर उपक्रमांचे संयुक्त आयोजन किंवा त्यामध्ये सहभाग यांचा समावेश आहे. उद्योगक्षेत्र, संशोधन आणि नवोपक्रम यांना एकत्र आणून सामायिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी सहकार्याची नवी दालने खुली करण्याची क्षमता या उपक्रमात आहे. दोन्ही संस्थांची क्षमता आणि तज्ज्ञता एकमेकांना पूरक ठरू शकेल. सहकार्याचा विस्तार होत असताना विशिष्ट कार्यक्रम, जबाबदाऱ्या, अर्थसंकल्प आणि अंमलबजावणीविषयक व्यवस्था स्वतंत्रपणे परस्पर संमतीने निश्चित केल्या जातील, असे सागर अहिवळे यांनी नमूद केले.

या कराराबाबत पुढे सांगताना सागर अहिवळे म्हणाले, ज्ञानाची देवाणघेवाण आणि तंत्रज्ञानाधारित उपक्रमांच्या संधी शोधण्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्थांशी संवाद व सहकार्य वाढवण्याच्या दिशेने आम्ही कार्यरत आहोत, हा करार हा त्याचाच एक भाग आहे. अशा सहकार्यामुळे औद्योगिक अनुभव, संस्थात्मक संपर्कजाळे आणि वैज्ञानिक तज्ज्ञता यांचा दोन्ही संस्थांना चांगला उपयोग होऊ शकतो. यामध्ये दोन्ही संस्थांना संमत असलेल्या आणि अर्थपूर्ण अशा कार्यक्रमांवर भर देण्यात येईल. पुढील टप्प्यात प्राधान्यक्रमाची क्षेत्रे निश्चित करणे, व्यवहार्य संधींचे मूल्यमापन करणे आणि दोन्ही संस्थांची उद्दिष्टे व क्षमता यांच्याशी सुसंगत असे उपक्रम परस्पर संमतीने विकसित करणे यावर भर दिला जाईल. त्यामुळे, हा सामंजस्य करार भारत–चेक प्रजासत्ताक यांच्यातील संस्थात्मक सहकार्याच्या नव्या संधी खुल्या करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण ठरेल.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×