विद्यार्थ्यांनी भ्रमणध्वनीचा वापर मर्यादित ठेवून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे- दीपा मुधोळ-मुंडे
marathinews24.com
पुणे – Pune Seva Sankalp Campaign : समाजकल्याण विभागाच्या स्थापना दिनानिमित्त सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, पुणे आणि विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बिबवेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेवा संकल्प अभियान’ उत्साहात राबविण्यात आले. या उपक्रमात सुमारे ८०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी भ्रमणध्वनीचा वापर मर्यादित ठेवून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, ‘डिजिटल डिटॉक्स’ संकल्पना अंगीकारावी आणि समाजकल्याण विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे यांनी केले.
‘ग्रीन सोल्यूशन’ व चेक प्रजासत्ताकातील ‘रिसर्च सेंटर’मध्ये सामंजस्य करार – सविस्तर बातमी
सामाजिक न्याय, समता, बंधुता आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी यांची जाणीव युवकांमध्ये निर्माण करणे, तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती पोहोचविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांप्रती संवेदनशीलतेची शपथ देण्यात आली. Pune Seva Sankalp Campaign तसेच ‘सेवा माझे योगदान’, आभार व संकल्पाची मानवी रांगोळी आणि समाजकल्याण विभागाच्या विविध योजनांविषयी विशेष कार्यशाळा घेण्यात आली.
यावेळी सहायक आयुक्त विशाल लोंढे, प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे आणि संस्थेचे संचालक डॉ. राजेश जालनेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. समाजकल्याण निरीक्षक शहागडकर यांनी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली.
महामानवांकडून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी जीवन उज्वल करावे असे सांगून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभलेल्या या उपक्रमातून सामाजिक संवेदनशीलता, सेवाभाव आणि समाजहितासाठी योगदान देण्याची प्रेरणा निर्माण होण्यास मदत होईल असा विश्वास श्री. लोंढे यांनी व्यक्त केला.




















