Breking News
MLC Election 2026 : विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदानBaramati Wastewater Reuse : बारामतीत सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापरPune News : पुण्यात २२ ऑक्टोबरला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्रPune Assault Cases : महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; कोरेगाव पार्कमधील घटनाPune Post Office : टपाल विभागाच्यावतीने २७ ऑक्टोबरला पेन्शन अदालतीचे आयोजनYerawada Drainage Pit Death Case : येरवड्यात खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यूPune Fodder Production Plan : पुणे जिल्ह्यात २५ हजार एकरांवर चारा उत्पादनाचे नियोजनPune Police : पुण्यातील १० गुन्हेगारांना तडीपारीचा दणकाPune Water Scarcity Action Plan : संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी त्रैमासिक कृती आराखडा तातडीने सादर करा – अमित पाथरवटPune Cyber Crime : पेन्शनकार्ड नोंदणीची बतावणी, जेष्ठाला ५ लाखांचा गंडा

Marathi Poetry Music Program: मराठी कवितेतील शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताचा पुण्यात रंगणार अनोखा आविष्कार

मराठी कवितेतील शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताचा पुण्यात रंगणार अनोखा आविष्कार* *१८ ऑक्टोबर रोजी एसएनडीटी महाविद्यालयात गायन, कथक नृत्य आणि चर्चासत्राचे आयोजन; रसिकांसाठी प्रवेश विनामूल्य* पुणे, दि. १५ ऑक्टोबर २०२६ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने ‘मराठी कवितेमध्ये शास्त्रीय-उपशास्त्रीय गानप्रकार’ या विषयावर आधारित गायन, कथक नृत्य आणि चर्चासत्राचे आयोजन रविवार, दि. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत एसएनडीटी महाविद्यालय, पीजीएसआर हॉल, कर्वे रोड, पुणे येथे करण्यात आले आहे. मराठी कवितेतील भावसौंदर्य, शब्दलालित्य आणि संगीत यांचा परस्परसंबंध उलगडणाऱ्या या उपक्रमातून रसिकांना साहित्य आणि संगीताचा अनोखा संगम अनुभवता येणार आहे. मराठी कवितेला शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताची समृद्ध परंपरा लाभली आहे. अनेक कवींच्या रचनांना विविध राग, ताल, बंदिशी आणि गानप्रकारांच्या माध्यमातून संगीतबद्ध करण्यात आले असून, त्यामुळे कवितेतील आशय, भाव आणि लय यांना अधिक व्यापक अभिव्यक्ती प्राप्त झाली आहे. कवितेतील शब्द आणि संगीतामधील स्वर यांचा परस्पर संवाद कसा घडतो, कवितेच्या आशयाला रागदारी आणि उपशास्त्रीय गानप्रकार कशा प्रकारे नवी अनुभूती देतात, याचा प्रत्यय या कार्यक्रमातून रसिकांना येणार आहे. या कार्यक्रमात स्वरकार वि. सानिया पाटणकर यांच्या संकल्पनेतून मराठी कवितेवर आधारित शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायनप्रकारांचे सादरीकरण होणार आहे. गायन विभागात वि. सानिया पाटणकर, वेदवती परांजपे, शिल्पा आठले, आदिती नगरकर, प्रीती सोहनी आणि भूषण तोष्णीवाल सहभागी होणार आहेत. मराठी कवितेतील विविध भावछटा स्वरांच्या माध्यमातून सादर करताना शास्त्रीय संगीताची बांधणी आणि उपशास्त्रीय संगीताची भावप्रधानता यांचा सुरेल अनुभव रसिकांना मिळणार आहे. कार्यक्रमात माधुरी आपटे यांचे कथक नृत्य सादर होणार असून, यश सोमण आणि देवेंद्र देशपांडे साथसंगत करणार आहेत. कथकच्या नृत्यभाषेतून कवितेतील भाव, आशय आणि लय यांचे सादरीकरण हे कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य ठरणार आहे. त्यामुळे शब्द, स्वर, ताल आणि नृत्य यांच्या माध्यमातून मराठी कवितेचे विविधांगी सौंदर्य अनुभवण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. कार्यक्रमाच्या चर्चासत्रात मराठी कवितेतील गेयता, काव्य आणि संगीताचा अनुबंध, कवितेचे गायनासाठी होणारे रूपांतर, शास्त्रीय-उपशास्त्रीय गानप्रकार आणि मराठी काव्यपरंपरा अशा विविध विषयांवर विचारमंथन होणार आहे. यामध्ये चिंतामणी जोगळेकर, डॉ. अभिजित थिटे, ज्योत्स्ना चांदगुडे, नीलिमा फाटक आणि मिताली लिमये हे कवी सहभागी होणार आहेत. मुकुंद कुळे वक्ते म्हणून उपस्थित राहणार असून, वीणा केळकर निवेदनाची जबाबदारी सांभाळणार आहेत. मराठी कवितेचे संगीताशी असलेले नाते केवळ गायनापुरते मर्यादित नसून त्यामध्ये शब्द, स्वर, लय, भाव, ताल आणि सादरीकरण या सर्व घटकांचा समन्वय असतो. या विविध अंगांचा वेध घेण्याबरोबरच मराठी कवितेतील संगीतात्मकता नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे, काव्य आणि संगीताच्या परंपरेची ओळख करून देणे आणि रसिकांना या कलाप्रकारांचा प्रत्यक्ष अनुभव देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. कविता आणि संगीत या दोन्ही कला परंपरा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. मराठी काव्यपरंपरेतील अभिजात साहित्य आणि भारतीय शास्त्रीय तसेच उपशास्त्रीय संगीत यांचा संगम नव्या पिढीसमोर सादर करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. साहित्यप्रेमी, संगीतप्रेमी, विद्यार्थी, कलाकार आणि अभ्यासकांसाठीही हा कार्यक्रम विशेष उपयुक्त ठरणार आहे. हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमास डॉ. किरण कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध साहित्यिक, सांगीतिक आणि कलात्मक परंपरेचे जतन, संवर्धन व प्रसार करण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विविध सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. Marathi Poetry Music Program

१८ ऑक्टोबर रोजी एसएनडीटी महाविद्यालयात गायन, कथक नृत्य आणि चर्चासत्राचे आयोजन; रसिकांसाठी प्रवेश विनामूल्य

पुणे – Marathi Poetry Music Program : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने ‘मराठी कवितेमध्ये शास्त्रीय-उपशास्त्रीय गानप्रकार’ या विषयावर आधारित गायन, कथक नृत्य आणि चर्चासत्राचे आयोजन रविवार, दि. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत एसएनडीटी महाविद्यालय, पीजीएसआर हॉल, कर्वे रोड, पुणे येथे करण्यात आले आहे. मराठी कवितेतील भावसौंदर्य, शब्दलालित्य आणि संगीत यांचा परस्परसंबंध उलगडणाऱ्या या उपक्रमातून रसिकांना साहित्य आणि संगीताचा अनोखा संगम अनुभवता येणार आहे.

स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य देणे हा स्वार्थ नसून कुटुंबाच्या सक्षमतेची गरज’ – बागेश्री मंथाळकर – सविस्तर बातमी 

मराठी कवितेला शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताची समृद्ध परंपरा लाभली आहे. अनेक कवींच्या रचनांना विविध राग, ताल, बंदिशी आणि गानप्रकारांच्या माध्यमातून संगीतबद्ध करण्यात आले असून, त्यामुळे कवितेतील आशय, भाव आणि लय यांना अधिक व्यापक अभिव्यक्ती प्राप्त झाली आहे. कवितेतील शब्द आणि संगीतामधील स्वर यांचा परस्पर संवाद कसा घडतो, कवितेच्या आशयाला रागदारी आणि उपशास्त्रीय गानप्रकार कशा प्रकारे नवी अनुभूती देतात, याचा प्रत्यय या कार्यक्रमातून रसिकांना येणार आहे.

या कार्यक्रमात स्वरकार वि. सानिया पाटणकर यांच्या संकल्पनेतून मराठी कवितेवर आधारित शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायनप्रकारांचे सादरीकरण होणार आहे. गायन विभागात वि. सानिया पाटणकर, वेदवती परांजपे, शिल्पा आठले, आदिती नगरकर, प्रीती सोहनी आणि भूषण तोष्णीवाल सहभागी होणार आहेत. मराठी कवितेतील विविध भावछटा स्वरांच्या माध्यमातून सादर करताना शास्त्रीय संगीताची बांधणी आणि उपशास्त्रीय संगीताची भावप्रधानता यांचा सुरेल अनुभव रसिकांना मिळणार आहे.

कार्यक्रमात माधुरी आपटे यांचे कथक नृत्य सादर होणार असून, यश सोमण आणि देवेंद्र देशपांडे साथसंगत करणार आहेत. कथकच्या नृत्यभाषेतून कवितेतील भाव, आशय आणि लय यांचे सादरीकरण हे कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य ठरणार आहे. त्यामुळे शब्द, स्वर, ताल आणि नृत्य यांच्या माध्यमातून मराठी कवितेचे विविधांगी सौंदर्य अनुभवण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.

Marathi Poetry Music Program कार्यक्रमाच्या चर्चासत्रात मराठी कवितेतील गेयता, काव्य आणि संगीताचा अनुबंध, कवितेचे गायनासाठी होणारे रूपांतर, शास्त्रीय-उपशास्त्रीय गानप्रकार आणि मराठी काव्यपरंपरा अशा विविध विषयांवर विचारमंथन होणार आहे. यामध्ये चिंतामणी जोगळेकर, डॉ. अभिजित थिटे, ज्योत्स्ना चांदगुडे, नीलिमा फाटक आणि मिताली लिमये हे कवी सहभागी होणार आहेत. मुकुंद कुळे वक्ते म्हणून उपस्थित राहणार असून, वीणा केळकर निवेदनाची जबाबदारी सांभाळणार आहेत.

मराठी कवितेचे संगीताशी असलेले नाते केवळ गायनापुरते मर्यादित नसून त्यामध्ये शब्द, स्वर, लय, भाव, ताल आणि सादरीकरण या सर्व घटकांचा समन्वय असतो. या विविध अंगांचा वेध घेण्याबरोबरच मराठी कवितेतील संगीतात्मकता नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे, काव्य आणि संगीताच्या परंपरेची ओळख करून देणे आणि रसिकांना या कलाप्रकारांचा प्रत्यक्ष अनुभव देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

कविता आणि संगीत या दोन्ही कला परंपरा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. मराठी काव्यपरंपरेतील अभिजात साहित्य आणि भारतीय शास्त्रीय तसेच उपशास्त्रीय संगीत यांचा संगम नव्या पिढीसमोर सादर करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. साहित्यप्रेमी, संगीतप्रेमी, विद्यार्थी, कलाकार आणि अभ्यासकांसाठीही हा कार्यक्रम विशेष उपयुक्त ठरणार आहे.

हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमास डॉ. किरण कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध साहित्यिक, सांगीतिक आणि कलात्मक परंपरेचे जतन, संवर्धन व प्रसार करण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विविध सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येत आहेत.

कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून, साहित्य, संगीत, नृत्यप्रेमी तसेच विद्यार्थी, कलाकार आणि रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आगळ्यावेगळ्या सांस्कृतिक उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×