Breking News
MLC Election 2026 : विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदानBaramati Wastewater Reuse : बारामतीत सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापरPune News : पुण्यात २२ ऑक्टोबरला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्रPune Assault Cases : महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; कोरेगाव पार्कमधील घटनाPune Post Office : टपाल विभागाच्यावतीने २७ ऑक्टोबरला पेन्शन अदालतीचे आयोजनYerawada Drainage Pit Death Case : येरवड्यात खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यूPune Fodder Production Plan : पुणे जिल्ह्यात २५ हजार एकरांवर चारा उत्पादनाचे नियोजनPune Police : पुण्यातील १० गुन्हेगारांना तडीपारीचा दणकाPune Water Scarcity Action Plan : संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी त्रैमासिक कृती आराखडा तातडीने सादर करा – अमित पाथरवटPune Cyber Crime : पेन्शनकार्ड नोंदणीची बतावणी, जेष्ठाला ५ लाखांचा गंडा

Pune Graduate Teacher Constituency Election : प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या दौऱ्याने भाजप-महायुतीच्या प्रचाराला नवी ऊर्जा

Pune Graduate Teacher Constituency Election

कार्यकर्त्यांमध्ये विजयाचा विश्वास

marathinews24.com

पुणे – Pune Graduate Teacher Constituency Election : पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या दोन दिवसीय पुणे व सांगली दौऱ्याने भाजप-महायुतीच्या प्रचाराला नवी दिशा दिली असून, स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि विजयाचा विश्वास निर्माण झाला आहे.

श्री महासरस्वती देवीला स्फटिक माळ, तर श्री महाकाली देवीला रुद्राक्ष माळ अर्पण – सविस्तर बातमी 

पुणे, पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण आणि सांगली-मिरज येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकांमध्ये चव्हाण यांनी निवडणुकीच्या तयारीचा सविस्तर आढावा घेत प्रचाराची पुढील दिशा आणि रणनीतीबाबत मार्गदर्शन केले. पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव आणि पुणे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांना विजयी करण्यासाठी संघटितपणे आणि पूर्ण ताकदीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

युवा मोर्चाच्या माजी पदाधिकाऱ्यांपासून स्थानिक कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांच्या अनुभवाचा आणि जनसंपर्काचा प्रभावी उपयोग करण्यावर त्यांनी भर दिला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप-महायुती सरकारचे शिक्षण व रोजगारनिर्मिती क्षेत्रातील कार्य शिक्षक आणि पदवीधर मतदारांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. (Pune Graduate Teacher Constituency Election) प्रदेशाध्यक्षांच्या थेट संवादातून कार्यकर्त्यांना मिळालेले मार्गदर्शन आणि प्रचाराचे स्पष्ट नियोजन यामुळे निवडणुकीच्या तयारीला गती मिळाली असून, दोन्ही उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार अधिक दृढ झाला आहे.

या दोन दिवसीय दौऱ्यात मंत्री चंद्रकांतदादा पाटील, राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, भाजप महाराष्ट्र महिला मोर्चाच्या अध्यक्षा आमदार चित्रा वाघ, भाजप प्रदेश सरचिटणीस आ. माधवी नाईक, भाजप प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, भाजप प्रदेश सरचिटणीस आ. योगेश सागर, भाजप प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, आ. प्रसाद लाड, आ. महेश लांडगे, आ. अमित गोरखे, आ. उमा खापरे, आ. राहुल कुल, आ. भिमराव तापकीर, आ. हेमंत रासने, आ. सुनील कांबळे, आ. सिद्धार्थ शिरोळे, आ. योगेश टिळेकर, आ. सुरेश खाडे, आ. धनंजय उर्फ सुधीर गाडगीळ, भाजप महाराष्ट्र प्रदेश शिक्षक आघाडीचे संयोजक व पुणे शिक्षक मतदारसंघाचे नोंदणी प्रमुख डॉ. प्रशम कोल्हे, भाजप महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष अनुप मोरे, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, सांगली ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×