Breking News
MLC Election 2026 : विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदानBaramati Wastewater Reuse : बारामतीत सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापरPune News : पुण्यात २२ ऑक्टोबरला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्रPune Assault Cases : महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; कोरेगाव पार्कमधील घटनाPune Post Office : टपाल विभागाच्यावतीने २७ ऑक्टोबरला पेन्शन अदालतीचे आयोजनYerawada Drainage Pit Death Case : येरवड्यात खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यूPune Fodder Production Plan : पुणे जिल्ह्यात २५ हजार एकरांवर चारा उत्पादनाचे नियोजनPune Police : पुण्यातील १० गुन्हेगारांना तडीपारीचा दणकाPune Water Scarcity Action Plan : संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी त्रैमासिक कृती आराखडा तातडीने सादर करा – अमित पाथरवटPune Cyber Crime : पेन्शनकार्ड नोंदणीची बतावणी, जेष्ठाला ५ लाखांचा गंडा

MLA Sunil Shelke : आमदार सुनील शेळकेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली; आरटीआय कार्यकत्याचा आरोप

MLA Sunil Shelke

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात घडली घटना

marathinews24.com

पुणे – MLA Sunil Shelke : जिल्ह्यातील मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांच्या कार्यकर्त्यांनी आरटीआय कार्यकर्त्याला पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात खोलीत डांबून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तहसीलदारांकडे तक्रार अर्ज केल्यामुळे मारहाण झाल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते सुनील गुजर यांनी दिली. दुसरीकडे आमदार सुनील शेळके यांनी मात्र, संबंधित व्यक्ती गेल्या काही दिवसांपासून पाळत ठेवत असून, त्यांची माहिती गुन्हेगार, राजकीय व्यक्तींना पुरवत असल्याचा तक्रार अर्ज पोलीस ठाण्यात दिला आहे. त्यामुळे बंडगार्डन पोलिसांनी दोन्ही बाजूने चौकशी सुरू केली आहे.

पुण्यात गणेशोत्सवात दागिने चोरणार्‍या उत्तर प्रदेशातील टोळीला अटक – सविस्तर बातमी 

सुनील रघुनाथ गुजर (वय ४८, रा. कामशेत. ता. मावळ) यांनी रात्री उशिरा बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गुजर हे आरटीआय कार्यकर्ते असून त्यांनी मावळ परिसरातील पिंपळोली भागात अवैधरित्या खानीत उत्खनन केले जात असल्याची माहिती मागितली होती. शासनाने उत्खन्न करण्यासाठी परवानगी दिलेली नसल्याचे समजताच त्यांनी तहसीलदार यांच्याकडे तक्रार अर्ज केला होता. संबंधित प्रकरणात तलाठी कार्यालयाला कारवाई करण्याचे सांगण्यात आले होते. तरीही गेल्या काही महिन्यांपासून त्याठिकाणी उत्खनन सुरूच असल्याचे गुजर यांना दिसून आले. त्यांनी याचे फोटो, व्हिडीओ देखील तहसील कार्यालयाकडे दिले.

संबंधित तलाठी हे तक्रारदार यांना बोलवून घेत, तक्रार करू नका असे सांगत होता, अशी माहिती गुजर यांच्या वकिलांनी दिली. पण, तक्रारदार हे माहिती सातत्याने घेत होते. दुसरीकडे उत्खनन करता येईल का, यासंदंर्भाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तेथून अद्याप प्रस्तावावर काहीही म्हणणे आलेले नाही. तरीही आमदार शेळके यांच्या कार्यकर्त्यांकडून त्याठिकाणी अवैधरित्या उत्खनन सुरू असल्याची माहिती गुजर यांनी दिली. शुक्रवारी दुपारी गुजर हे जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते. त्यावेळी आमदार सुनील शेळके यांच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना गाठले. त्यांना खोलीत डांबून मारहाण केल्याची माहिती गुजर यांनी दिली.

धक्काबुक्की तसेच ढकलून देताना सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली असल्याचे म्हटले आहे. याबाबत तक्रार दाखल करत असल्याची माहितीही त्यांनी दिली. बंडगार्डन पोलिसांनी यासंदंर्भात दोन्ही अर्ज दाखलकरून घेत कायदेशीर तपास सुरू केला असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

आमदार सुनील शेळके MLA Sunil Shelke यांनी बंडगार्डन पोलिसांकडे तक्रार दिली असून, सुनील रघुनाथ गुजर (रा. पिंपळोली, ता. मावळ, जि. पुणे) हे गेल्या अनेक दिवसांपासून कार्यालय तसेच नियोजित कार्यक्रमांच्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ता म्हणून येऊन त्यांच्यावर पाळत ठेवत असल्याची माहिती यापूर्वी मिळाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच आमदारांची माहिती राजकीय विरोधकांसह गुन्हेगारांपर्यंत पोहोचवली जात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणाच्या अनुषंगाने रामदास काकडे यांच्या सांगण्यावरून संबंधित व्यक्ती हे सर्व करत असल्याचे समजत असल्याचाही उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. या आरोपांची स्वतंत्रपणे अधिकृत पुष्टी झालेली नाही. आमदार शेळके यांनी संबंधित व्यक्तीची चौकशी करावी, त्याच्या दोन्ही मोबाईलमधील कॉल रेकॉर्ड तपासावे, प्रकरणात तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पोलिसांकडे केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×