Breking News
MLC Election 2026 : विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदानBaramati Wastewater Reuse : बारामतीत सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापरPune News : पुण्यात २२ ऑक्टोबरला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्रPune Assault Cases : महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; कोरेगाव पार्कमधील घटनाPune Post Office : टपाल विभागाच्यावतीने २७ ऑक्टोबरला पेन्शन अदालतीचे आयोजनYerawada Drainage Pit Death Case : येरवड्यात खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यूPune Fodder Production Plan : पुणे जिल्ह्यात २५ हजार एकरांवर चारा उत्पादनाचे नियोजनPune Police : पुण्यातील १० गुन्हेगारांना तडीपारीचा दणकाPune Water Scarcity Action Plan : संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी त्रैमासिक कृती आराखडा तातडीने सादर करा – अमित पाथरवटPune Cyber Crime : पेन्शनकार्ड नोंदणीची बतावणी, जेष्ठाला ५ लाखांचा गंडा

Women Police Officers Pune : महिला पोलिसांचे कर्तृत्व पुरुषांपेक्षा एक पाऊल पुढे-पोलीस सह आयुक्त संजय दराडे

Women Police Officers Pune

श्री महालक्ष्मी मंदिरात कर्तृत्ववान महिला पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान

marathinews24.com

पुणे – Women Police Officers Pune : पोलीस दलातील महिला अधिकारी आणि कर्मचारी दिवस-रात्र पुणेकरांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असतात. पोलीस दलातील धावपळीच्या आणि आव्हानात्मक नोकरीसोबतच त्या घराची जबाबदारीही समर्थपणे सांभाळतात. पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या पोलीस क्षेत्रात कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे योगदान पुरुषांपेक्षा एक पाऊल पुढे आहे. असे प्रतिपादन पोलीस सह आयुक्त संजय दराडे यांनी केले.

पीक पंचनामे गतीने पूर्ण करा; यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले – सविस्तर बातमी 

सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिराच्या वतीने कर्तृत्ववान महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा संजय दराडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. श्री महालक्ष्मी मंदिर ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता राजकुमार अग्रवाल, उत्सव प्रमुख डॉ. तृप्ती भरत अग्रवाल, विश्वस्त भरत अग्रवाल, ॲड. प्रताप परदेशी, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, युवराज लाहोटी यांसह विशाल सोनी आदी उपस्थित होते.

संजय दराडे म्हणाले, पोलीस दलात गेल्या २० वर्षांपासून महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण आहे. पोलीस दलातील कर्तव्याचे स्वरूप आव्हानात्मक असून, २४ तास दक्ष राहावे लागते. कधीही फोन येऊ शकतो आणि तातडीने कर्तव्यावर हजर व्हावे लागते. (Women Police Officers Pune) अशा परिस्थितीतही महिला पोलीस अधिकारी कुटुंबातील जबाबदाऱ्या पार पाडून विभागाचे कर्तव्य बजावतात. डॉक्टरांची ओपीडी रात्री थांबते; मात्र महिला पोलिसांचे काम २४ तास सुरू असते. या आव्हानांना सामोरे जात त्या धैर्याने आणि खंबीरपणे काम करतात.

भरत अग्रवाल म्हणाले, नवरात्रोत्सवात देवीचा जागर केला जातो. यानिमित्ताने समाजाच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या या कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्याची संधी मिळाली. महिलांना कर्तृत्व दाखविण्याची संधी मिळाल्यास त्या पुरुषांनाही मागे टाकू शकतात. अनेक क्षेत्रांत महिलांनी आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले आहे. यावेळी अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, सहायक पोलीस आयुक्त अनिता मोरे, नूतन पवार, नम्रता देसाई, स्वप्ना बोकील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक, अश्विनी सातपुते, माया देवरे, रुणाल मुल्ला, सुनीता नवले, प्रियंका गोरे, सहायक पोलीस निरीक्षक शरयू देशमुख, संजना काकडे तसेच वाहतूक शाखेतील पोलीस अंमलदार यांचा सन्मान करण्यात आला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×