Breking News
MLC Election 2026 : विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदानBaramati Wastewater Reuse : बारामतीत सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापरPune News : पुण्यात २२ ऑक्टोबरला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्रPune Assault Cases : महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; कोरेगाव पार्कमधील घटनाPune Post Office : टपाल विभागाच्यावतीने २७ ऑक्टोबरला पेन्शन अदालतीचे आयोजनYerawada Drainage Pit Death Case : येरवड्यात खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यूPune Fodder Production Plan : पुणे जिल्ह्यात २५ हजार एकरांवर चारा उत्पादनाचे नियोजनPune Police : पुण्यातील १० गुन्हेगारांना तडीपारीचा दणकाPune Water Scarcity Action Plan : संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी त्रैमासिक कृती आराखडा तातडीने सादर करा – अमित पाथरवटPune Cyber Crime : पेन्शनकार्ड नोंदणीची बतावणी, जेष्ठाला ५ लाखांचा गंडा

FFFS Fertilizer System Maharashtra : खत खरेदीसाठी ‘एफएफएफएस’ प्रणाली २२ ऑक्टोबरपासून राज्यभर लागू

FFFS Fertilizer System Maharashtra

खतांचा साठा, उपलब्धता व आगाऊ बुकिंगची माहिती मोबाईलवर मिळणार

marathinews24.com

पुणे – FFFS Fertilizer System Maharashtra : शेतकऱ्यांना खत खरेदीची प्रक्रिया सुलभ, पारदर्शक आणि डिजिटल करण्यासाठी केंद्र शासनाने विकसित केलेली ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ (FFFS) प्रणाली २२ ऑक्टोबरपासून संपूर्ण राज्यात लागू करण्यात येणार आहे. या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना संबंधित खत विक्री केंद्रावरील खतांची उपलब्धता आणि साठ्याची माहिती मोबाईलवर मिळणार असून, शेतजमिनीच्या क्षेत्रानुसार खताचे आगाऊ बुकिंग करण्याची सुविधाही उपलब्ध होणार आहे.

सिंबायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटीमध्ये सरस्वती पूजनाचा सोहळा उत्साहात संपन्न – सविस्तर बातमी 

या प्रणालीसाठी केंद्र शासनाने ‘FFFS’ ॲप विकसित केले आहे. शेतकऱ्यांनी हे ॲप मोबाईलमध्ये play store मधून डाउनलोड केल्यानंतर विविध खत विक्री केंद्रांवरील उपलब्ध खतांची माहिती आणि साठ्याचा तपशील पाहता येणार आहे. त्यामुळे खत खरेदीचे नियोजन करणे अधिक सोयीचे होणार असून, दुकानांबाहेर रांगेत उभे राहण्याची गरज कमी होण्यास मदत होणार आहे. FFFS Fertilizer System Maharashtra

या ॲपद्वारे खताचे आगाऊ बुकिंग केल्यानंतर संबंधित विक्रेत्याला बुक केलेले खत देणे बंधनकारक राहणार आहे. तसेच खतांची छापील किमतीपेक्षा अधिक दराने विक्री होणे आणि अनुदानित खतांसोबत इतर कृषी निविष्ठा खरेदी करण्याची सक्ती अर्थात ‘लिंकिंग’ यांसारख्या प्रकारांना आळा घालण्यास मदत होणार आहे.  ही प्रणाली सुरुवातीला नाशिक जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आली होती. आता २२ ऑक्टोबरपासून तिची अंमलबजावणी संपूर्ण राज्यात करण्यात येणार आहे.

या प्रणालीबाबत पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही तक्रारी, अडचणी किंवा शंका असल्यास त्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी अधिकारी अथवा पंचायत समिती कार्यालयातील कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×