स्वारगेट परिसरातील घटना
marathinews24.com
पुणे – Pune Swargate Extortion Case : मोटारीचा अपघात झाल्यानंतर नुकसान भरपाईच्या नावाखाली मोटार चालक तरुणीला धमकावून तिच्याकडून ५० हजार रुपये घेतल्याची घटना स्वारगेट मेट्रो स्थानक परिसरात घडली. या प्रकरणी एका मोटार चालकाविरुद्ध स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत २१ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. या प्रकरणी एका मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आराेपी मोटार चालक सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटी भागात राहायला आहे.
कुरिअरच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची ३ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मोटार चालक एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. ती वडगाव बुद्रुक परिसरात राहायला आहे. तक्रारदार तरुणी १५ ऑक्टोबर रोजी रात्री सव्वाअकराच्या सुमारास मोटारीतून नीलायम चित्रपटगृह परिसरातून निघाली होती. मोटारीचा टायर अचानक फुटला. मोटार चालक तरुणीचे नियंत्रण सुटले. त्या वेळी पाठीमागून आलेल्या मोटारीने धडक दिली. मोटार चालक तरुणीच्या चुकीमुळे अपघात घडला, तसेच मोटारीचे नुकसान झाले, असा आरोप मोटार चालक आरोपीने केला. मोटार चालक तरुणीशी वाद घालण्यात आला. तिला धमकाविण्यात आले.
१६ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास स्वारगेट मेट्रो स्थानक परिसरात मोटार चालक तरुणीला बोलावून धमकाविण्यात आले. (Pune Swargate Extortion Case) या प्रकरणात मोटार चालक तरुणीविरुद्ध पोलिसांकडे तक्रार देण्यात येणार आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर शैक्षणिक नुकसान होईल, अशी धमकी देण्यात आली. त्यानंतर तरुणीला धमकावून तिच्याकडून ऑनलाइन पद्धतीने ५० हजार रुपये घेण्यात आले. घाबरलेल्या मोटार चालक तरुणीने दुसऱ्या दिवशी स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक संजय शिरसाठ तपास करत आहेत.




















