Breking News
ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या कुटुंबियांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सांत्वनशेतीमध्ये भांडवली गुंतवणुकीसाठी दरवर्षी पाच हजार कोटी रुपये देणार- कृषीमंत्री ॲड.माणिकराव कोकाटेपशुसंवर्धन व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्यासाठी सकारात्मक-उपमुख्यमंत्री अजित पवारपुढील वर्षी बाल पुस्तक जत्रेत सांस्कृतिक कार्य विभागाचा सहभाग- सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड.आशिष शेलारपुण्यात कॉल सेंटरच्या आडून ‘सायबर गुन्हेगारी’चा डावमाझ्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे, बदनामी थांबवा- विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकरबनावट कागदपत्राच्या आधारे भारतात केला प्रवेश१० कोटीचे कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने ३५ लाखांची फसवणूकमहाराष्ट्र पोलीस दलाचा लौकिक वाढविण्यासोबतच सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी काम करावे-उपमुख्यमंत्री अजित पवारशेतकऱ्यांच्या हक्काचे संरक्षण करण्यासोबतच कृषी क्षेत्राच्या बळकटीकरणाकरिता राज्य शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री अजित पवार

१० कोटीचे कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने ३५ लाखांची फसवणूक

संबंधित महिलेविरोधात फुरसुंगी पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – बांधकाम व्यावसायिकाला तब्बल १० कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याची बतावणी करीत महिलेने उरळी देवाची परिसरात शेवाळेवाडीतील एकाला ३५ लाखांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी उल्हास रामचंद्र शेवाळे (वय ४९) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार माधुरी हेमंत शिरोडकर (वय ५१ रा.वारजे ,पुणे ) महिलेविरुद्ध फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०२० ते २०२३ कालावधीत बँक अधिकाऱ्यांची नावे सांगून त्यांना खर्चाकरता व कर्ज प्रकरण मंजुरी करता लागणारी प्रोसेसिंग फी म्हणून वेळोवेळी रोख स्वरूपात चेकने तसेच बँक खात्यातून सुमारे ३५ लाख रुपये घेऊन फसवणूक केली आहे.

पुण्यातील किडनी रॅकेटमध्ये ससूनमधील डाॅ. अजय तावरे सहआरोपी – सविस्तर बातमी

आरोपी माधुरी शिरोडकर हिच्यावर फुरसुंगी पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार उल्हास शेवाळे हे बांधकाम व्यावसायिक असून, ते सी ए सचिन शिंदे यांच्याकडे कामासाठी जात होते. सन २०२० मध्ये ते शिंदे यांच्या कार्यालयात गप्पा मारत असताना, त्यांनी कर्ज काढायचे असल्याचे सांगितले. तुमचे कर्ज प्रकरण करून देणारे कोणी ओळखीचे आहे का असे त्यांनी विचारले असता, माधुरी शिरोडकर यांची ओळख शिंदे यांनी करून दिली. शिरोडकर यांची विविध बँकेत ओळख असून त्या बँकेत मोठी कर्ज प्रकरणे मंजूर करून देतात असे शिंदे यांनी सांगितले. त्यानुसार शिरोडकर यांना बांधकाम व्यवसायासाठी १० कोटी रुपयांचे कर्ज असल्याचे सांगण्यात आले. शिरोडकर यांनी संबंधित कर्ज प्रकरण करून देते असे आश्वासन दिले. शिरोडकर यांनी तुम्हाला जर तात्काळ कर्ज हवे असेल तर तुम्ही नवीन कर्ज प्रकरण तयार करून घेण्याचे ठरवले, तर त्याला खूप वेळ जाईल असे तिने सांगितले.

मी माझ्या स्वतःच्या कामाकरीता कर्ज प्रकरण बँकेत फाईल करून रक्कम ५० कोटी रुपये कर्ज मंजूर करून ठेवलेले आहे. परंतु सध्या मला इतक्या मोठ्या रकमेची गरज नाही. मी तुम्हाला तत्काळ माझ्या ५० कोटी कर्ज मधून १० कोटी रुपये कर्ज वापरण्यासाठी देऊ शकते. परंतु त्यासाठी तुम्ही मला कर्ज प्रकरणासाठी लागणारी प्रोसेसिंग फी व इतर खर्च करताना लागणारी रक्कम मला तुम्ही द्या असे शिरोडकर म्हणाली. त्यावेळी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून वेळोवेळी शेवाळे यांनी शिरोडकर यांना ३५ लाख रुपये विविध कामांसाठी दिले. मात्र ,त्यानंतर शिरोडकर यांनी कर्ज प्रकरणाबाबत विचारणा केल्यावर टाळाटाळ सुरू केली तसेच दिलेली रक्कम परत केली नाही त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top