मंदिरातील दानपेटी फोडून राेकड लांबविणारा अटकेत

स्वारगेट पोलिसांकडून आरोपीला अटक

marathinews24.com

पुणे – मंदिरातील दानपेटी फोडून ३८ हजारांची रोकड चोरुन पसार झालेल्या चोरट्याला स्वारगेट पोलिसांनी अटक केली. चोरट्याकडून ३८ हजार ४०० रुपये, तसेच कटावणी जप्त केली.

प्रवासी महिलांचे दागिने चोरणारा गजाआड – सविस्तर बातमी

महादेव तुकाराम गिरमकर (वय ४२, रा. कवठा, विकासवाडी, ता. श्रीगोंदा, अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. स्वारगेट भागातील मुकुंदनगर परिसरातील एका मंदिराचे दरवाजा तोडून दानपेटीतील ३८ हजारांची रोकड चोरुन नेण्यात आल्याची घटना नुकतीच घडली होती. स्वारगेट पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मंदिराच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले होते. चित्रीकरणात संशयित चोरटा दिसून आला होता. चित्रीकरणाच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. चित्रीकरणातील चोरट्याचा वावर स्वारगेट एसटी स्थानक परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी गिरमकरला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने मंदिरातील दानपेटी फोडून रोकड चोरल्याची कबुली दिली.

परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे, सहायक निरीक्षक राहुल काेलंबीकर, उपनिरीक्षक रवींद्र कस्पटे, शैलेश आलाटे, शंकर संपते, सागर केकाण, अश्रृबा मोराळे, हर्षल शिंदे, सुजय पवार, संदीप घुले, फिरोज शेख, रमेश चव्हाण यांनी ही कामगिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×