कोथरूडमधील बंगल्यात चंदन चोरी

कोथरूड पोलीस ठाण्यात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – कोथरूड भागातील एका बंगल्यात शिरलेल्या चोरट्यांनी चंदनाचे झाड कापून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छळामुळे विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरूड भागातील सोलारिस क्लबजवळ श्रीनिकेतन सोसायटीत तक्रारदारांचा बंगला आहे. शुक्रवारी मध्यरात्री चोरटे सीमाभिंतीवरुन उडी मारुन बंगल्यात शिरले. चोरट्यांनी बंगल्यातील चंदनाचे झाड कटरचा वापर करुन चोरुन नेले. बंगल्याच्या आवारातून चंदनाचे झाड कापून नेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर तक्रारदाराने पोलिसांकडे तक्रार दिली.

पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून, सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले आहे. सहायक पोलीस निरीक्षक बालाजी सानप तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×