विधानमंडळ येथे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक
marathinews24.com
मुंबई – चैत्यभूमी येथे भेट देणाऱ्या अनुयायांना चैत्यभूमी पासून इंदू मिल येल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकापर्यंत जाण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या मार्गाच्या कामातील अडथळे दूर करण्यात येतील, असे प्रतिपादन विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी केले.
खरीप हंगामात युरियासोबतच अन्य खताचा वापर करा – सविस्तर बातमी
विधानमंडळ येथे विधानसभा उपाध्यक्ष बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे अतिरिक्त महानगर आयुक्त विक्रमकुमार, कोकण महसूल विभागाचे विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी, प्रदीप कांबळे, शशी प्रभू, बुद्ध धर्मगुरू ,बुधिष्ट सेवा सोसायटी ऑफ इंडियाचे प्रतिनिधी, सामाजिक न्याय विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका, एम एम आर डी ए व विविध विभागांचे शासकीय अधिकारी उपस्थित होते.
विधानसभा उपाध्यक्ष बनसोडे म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे भव्य वास्तू उभे राहत आहे. पुढील वर्षीपर्यंत हे काम पूर्ण होईल. चैत्यभूमी येथे येणारे अनुयायी या स्मारकास देखील भेट देतील. या अनुषंगाने सदर मार्ग होणे गरजेचे आहे. चैत्यभूमीचे ठिकाण समुद्रकिनारी असल्याने पर्यावरण विषयक मान्यता, तसेच हा रुंद मार्ग बनविण्यासाठी आवश्यक जागा या दृष्टीने संबंधित शासकीय विभागांकडून नियोजन करण्यात येईल, यासाठी माहिती घेण्यात यावी.
उपाध्यक्ष बनसोडे म्हणाले, या दृष्टीने पर्यावरण विभाग व बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त यांचेकडून माहिती घेऊन कार्यवाही केली जाईल. यावेळी बुद्ध धर्मगुरू, बुद्धीष्ट सेवा सोसायटी ऑफ इंडियाचे प्रतिनिधी यांनी चैत्यभूमी व तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथील सुविधांबाबत मागण्यांची बैठकीत माहिती दिली. अनेक वर्षांपासून चैत्यभूमीच्या विकासासाठी काम केले जात असल्याचे सांगितले.