Breking News
पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील कार्यालयात आगपुण्यात सिमेंट मिक्सर’वाहतुकीला दोन दिवस सवलतशोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडतेआषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद‘तारपा’साठीच आमची वंशावळ-भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावनापुणे जिल्ह्यातील दोन सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्कापोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाणजनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाडिजीटल अटक करण्याची भीती, जेष्ठाला ११ लाखांचा गंडा

चऱ्होलीकर सोमवारी महापालिकेवर विराट मोर्चा काढणार

चऱ्होलीकर सोमवारी महापालिकेवर विराट मोर्चा काढणार

सोमवारी महापालिकेवर विराट मोर्चा काढण्याचा निर्णय चऱ्होली ग्रामस्थांनी घेतला

marathinews24.com

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने चऱ्होलीतील नगर रचना विकास योजना (टीपी स्कीम) रद्द करण्याचा अध्यादेश ३ जून रोजी काढण्यात येईल, असा शब्द दिला होता. मात्र तो शब्द न पाळल्याने चऱ्होली ग्रामस्थांनी आता थांबायचे नाही म्हणत लोकवर्गणीतून ही लढाई लढण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार येत्या सोमवारी महापालिकेवर विराट मोर्चा काढण्याचा निर्णय चऱ्होली ग्रामस्थांनी घेतला आहे.

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त कार्यलायात समन्वय बैठक – सविस्तर बातमी 

मंगळवारी टी पी स्कीम रद्द झाल्याचा अध्यादेश न निघाल्याने चऱ्होलीतील विठ्ठल मंदिरात ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. चऱ्होलीवर टीपी आणि डीपीचे आरक्षण टाकले आहे. त्याअनुषंगाने विरोध करण्यासाठी गावकऱ्यांनी टीपी हटाव, सातबारा बचावचा नारा दिला आहे. ही लढाई लढण्यासाठी लागणारा खर्च कोणा एका-दोघांवर न टाकता तो खर्च लोकवर्गणीतून जमविण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला. आता जोपर्यंत टीपी रद्दचा निर्णय होणार नाही, तोपर्यंत लढाई सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×