Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

सराईत शिवम आंदेकरविरुद्ध खंडणीचा गुन्हा

सराईत शिवम आंदेकरविरुद्ध खंडणीचा गुन्हा

आंदेकरसह साथीदार गजाआड

marathinews24.com

पुणे – मासळी बाजारातील व्यावसायिकाकडून दरमहा ५० हजार रुपयांची खंडणी उकळून हप्ता थकल्याने त्याच्या दुकानातील साहित्याची तोडफोड केल्याप्रकरणी आंदेकर टोळीतील सराइत शिवम आंदेकर याच्यासह साथीदाराला फरासखाना पोलिसांनी अटक केली. आंदेकरसह साथीदाराविरुद्ध खंडणी, दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात मच्छी विक्रेत्याकडून तब्बल ४८ लाखांची उकळली खंडणीn – सविस्तर बातमी 

शिवम उदयकांत आंदेकर (वय ३०, रा. डोके तालीम चौक, नाना पेठ), आकाश परदेशी (वय ३०, रा. लोहियानगर) यांना अटक केली आहे. याप्रकरणी आंदेकरसह सहा ते सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत व्यावसायिकाने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवम आंदेकर माजी नगरसेवक उदयकांत आंदेकर यांचा मुलगा आहे. त्याच्याविरुद्ध खंडणी, मारामारी, धमकावणे असे गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. २०२० मध्ये त्याला शहरातून तडीपार करण्यात आले होते. तडीपारीचा कालावधी पूर्ण केल्यानंतर तो शहरात आला होता. चतु:शृंगी परिसरात मोटार अडविल्याने एका पोलीस कर्मचाऱ्याशी वाद घालून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.

याप्रकरणात २०२१ मध्ये आंदेकरसह पाचजणांना अटक केली होती. तक्रारदाराचे गणेश पेठेतील मासळी बाजारात मासे विक्रीचा व्यवसाय आहे. २०१६ मध्ये शिवम आंदेकरने तक्रारदाराला जिवे मारण्याची धमकी देऊन दरमहा ५० हजार रुपयांचा हप्ता मागितला होता. आकाश परदेशी व्यावसायिकाकडून गेले आठ वर्ष व्यावसायिकाकडून दरमहा ५० हजार रुपये हप्ता घेत होता.

गेल्या आठ वर्षात आंदेकर आणि साथीदारांनी व्यावसायिकाकडून ४८ लाख रुपये हप्ता घेतला होता. हप्ता न दिल्याने मे महिन्यात शिवम, आकाश आणि साथीदारांनी त्याच्या दुकानातील साहित्य फेकून दिले होते. साहित्य टेम्पोतून घालून नेण्यात आले होते. घाबरलेल्या व्यावसायिकाने शुक्रवारी फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

त्यानंतर पोलिसांनी कारवाई करुन शिवमसह साथीदार आकाश यांना अटक केली. त्याचाबरोबर असलेल्या साथीदाराचा शोध घेण्यात येत आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अजित जाधव, सहायक निरीक्षक वैभव गायकवाड, उपनिरीक्षक अरविंद शिंदे यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×