Breking News
जनगणना २०२७ प्रक्रियेला आजपासून प्रारंभ; विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केली स्व-गणना‘दगडूशेठ’ गणपतीला ५ हजार शहाळ्यांचा महानैवेद्यपुण्यात ६७ वा महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्नपुण्यात भरधाव कारची दोन विद्यार्थिनी धडकगोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमी

ओैंधमधील वस्त्रदालनातून कपडे चोरीला

ओैंधमधील वस्त्रदालनातून कपडे चोरीला

चोरट्यांविरुद्ध खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे– वस्त्रदालनातून चोरट्यांनी ३६ हजार रुपयांचे कपडे चोरुन नेल्याची घटना औंधमध्ये उघडकीस आली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मौजमजेसाठी दुचाकी चोरणारा तरुण अटकेत – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचे बोपोडीतील भाऊ पाटील रस्त्यावर सिक्की कलेक्शन हे वस्त्रदालन आहे. चोरट्यांनी मंगळवारी मध्यरात्री दुकानाचा दरवाजा उचकटला. दुकानातील विविध प्रकारचे ३६ हजार रुपयांचे कपडे चोरुन चोरटे पसार झाले. मंगळवारी सकाळी दुकान उघडले. तेव्हा वस्त्रदालनात चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासले आहे.

पसार झालेल्या चाेरट्यांचा माग काढण्यात येत असून, पोलीस कर्मचारी शेवरे तपास करत आहेत. आठवड्यापूर्वी चोरट्यांनी पौड रस्ता परिसरातील एका वस्त्रदालनाचा दरवाजा उचकटून सहा लाख रुपयांचे विविध प्रकारचे कपडे चोरून नेले होते.

ओैंध रस्त्यावरील बंगल्यात चंदन चोरी

ओैंध रस्त्यावरील बंगल्यातून चोरट्यांनी चंदनाचे झाड कापून नेल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी खडकी पोलिसांनी चंदन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एकाने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारांचा खडकीतील औंध रस्ता परिसरात कैलास कुटीर इमारतीजवळ बंगला आहे. मंगळवारी मध्यरात्री बंगल्याच्या सीमाभिंतीवरुन उडी मारुन चोरटे आत शिरले. त्यांनी करवतीचा वापर करुन चंदनाचे झाड कापून नेले.

चंदनाचे झाड कापून नेण्यात आल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. पोलीस कर्मचारी चक्रे तपास करत आहेत शहरात चंदनाची झाडे कापून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, तसेच सोसायटी, बंगल्यांच्या आवराातून चोरट्यांनी चंदनाची झाडे कापून नेली आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×