पुणे व छत्रपती संभाजीनगर विभागातील मत्स्यव्यावसायिकांचा शनिवारी सन्मान सोहळा

पुणे व छत्रपती संभाजीनगर विभागातील मत्स्यव्यावसायिकांचा शनिवारी सन्मान सोहळा

पुण्यातील कृषी महाविद्यालय शनिवारी सन्मान सोहळा 

marathinews24.com

पुणे -राष्ट्रीय मत्स्यशेतकरी दिनाचे औचित्य साधून केंद्र व राज्य शासनाच्या मत्स्यव्यवसाय विषयक विविध योजनांची जनजागृती कार्यक्रम आणि पुणे व छत्रपती संभाजीनगर द्विविभागस्तरीय मत्स्यव्यावसायिकांचा सन्मान सोहळा शनिवार, १२ जुलै २०२५ रोजी पुण्यातील कृषी महाविद्यालय, शिवाजीनगर येथे आयोजित करण्यात आला आहे.

शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित ‌‘विठू माऊली माझी‌’ कार्यक्रमाला रसिकांची भरभरून दाद – सविस्तर बातमी 

मत्स्यव्यवसाय क्षेत्रामध्ये मत्स्यबीज उत्पादन, मासेमारी, मत्स्यशेती, केज कल्चर, बायोफ्लॉक कल्चर, शोभिवंत मत्स्यव्यवसाय, मत्स्यखाद्य, शितसाखळी, विपणन, नाविन्यपूर्ण मत्स्यउद्योजक, रिव्हर रँन्चिग, मत्स्यपर्यटन, सहकार, सामाजिक, प्रचार-प्रसार या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणारे अधिकारी, कर्मचारी, व्यक्ती, संस्था, कंपन्या आदींना प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमात विविध योजनांबरोबरच मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा मिळाल्यामुळे होणाऱ्या फायद्यांबाबत जनजागृती करण्यात येणार असल्याने जास्तीत जास्त मत्स्यव्यवसायिकांनी कार्यक्रमात सहभाग घ्यावा. अधिक माहितीसाठी ८७८८०९१६४९ व ९६६५६३२७९३ या क्रमाकांवर संपर्क साधवा, असे आवाहन पुणे व छत्रपती संभाजीनगर विभागाचे प्रादेशिक उपआयुक्त विजय शिखरे यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×