Breking News
पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरूणाचा केला खूनटेम्पोच्या धडकेत पादचारी ठार, चालक अटकेतप्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीमपुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

Crime News : धक्का लागल्याच्या वादातून टोळक्याकडून एकाचा खून

 सराइताचा गोळ्या झाडून सराइताचा खून

सासवड रस्त्यावरील घटना; सहा जण अटकेत

marathinews24.com

पुणे Crime News : धक्का लागल्याच्या वादातून टोळक्याकडून एकाचा खून – धक्का लागल्याच्या वादातून टोळक्याने एकाला दांडक्याने बेदम मारहाण करुन त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना हडपसर-सासवड रस्त्यावरील ऊरळी देवाची परिसरात घडली. याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. टोळक्याने केलेल्या मारहाणीत दोघे जण जखमी झाले असून, या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.

बालेवाडीत महिलेचे दागिने हिसकावले – सविस्तर बातमी 

रामलोचन हुसेनी कोरी (वय ४६, रा. उत्तरप्रदेश) असे खून झालेल्याचे नाव आहे. टोळक्याने केलेल्या मारहाणीत धीरज राम (वय २५) संतकुमार कोरी (वय २५, रा. ऊरूळी देवाची, हडपसर-सासवड रस्ता, फुरसंगी) हा जखमी झाला आहे. याप्रकरणी प्रेमलाल सुरतनाम कुमरे (वय २१), देवेस वसंत धुर्वे (वय २२), संजय पुल्स मसराम (वय २८), रणजीत प्रकाश जाधव (वय २०), सतीश भरत कुमरे (वय १८), विशाल मनाजी सरियाम (वय १८) यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत संतकुमार कोरी (वय २५, सध्या रा. नारंग ट्रान्सपोर्ट, ऊरळी देवाची, हडपसर-सासवड रस्ता)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतकुमार आणि रामलोचन हे मामा भाचे आहेत. रामलोचन, संतकुमार, धीरज हे मूळचे उत्तरप्रदेशातील आहेत. आरोपी हे मध्यप्रदेशातील आहेत. ऊरळी कांचन परिसरातील गोदामात ते हमाली करतात. आरोपीं आणि संतकुमार, रामलोचन यांच्यात एकमेकांकडे पाहण्यावरुन वाद झाला होता. गुरूवारी (१० जुलै) रात्री साडेनऊच्या सुमारास रामलोचन हे बटाटा वेफर्स आणण्यासाठी दुकानात गेले होते. तेव्हा आरोपीमधील एकाला त्यांचा धक्का लागला.

कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. वादानंतर आरोपींनी रामलोचन यांना दांडक्याने बेदम मारहाण केली. त्यानंतर आरोपी संतकुमार राहत असलेल्याखोलीत शिरले.आरोपींनी संतकुमार आणि धीरज यांना दांडक्याने बेदम मारहाण केली. मारहाणीत रामलोचन यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त अनुराधा उदमले यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या आरोपीना अटक करण्यात आली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेश खांडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×