मामा नव्हे कंसमामा, भाच्याचा केला खून

मामा नव्हे कंसमामा, भाच्याचा केला खून

मामा नव्हे कंसमामा, भाच्याचा केला खून

marathinews24

मराठीन्यूज २४ पुणे – मामा आणि भाच्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना नर्‍हे परिसरात घडली आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादावादीत मामाने भाच्याच्या छातीत चाकू भोसकून खून केला. ही घटना शुक्रवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास नर्‍हेतील कृष्णाईनगरी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ आरोपी मामाला अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली आहे.

दारूगोळा कारखान्यातील कामगारच निघाला चोर – सविस्तर बातमी 

गजानन गजकोश (वय १५, रा. धारावी कोळीवाड्याजवळ, मुंबई) असे ठार झालेल्या भाच्याचे नाव आहे. मेघनाथ अशोक तपासे (वय ४१, रा. फ्लट नं. १०१, कृष्णाई नगरी, मानाजीनगर, नर्‍हे) असे अटक केलेल्याआरोपीचे नाव आहे. आरोपीचा मेव्हणा मंगेश दत्तात्रय ओव्हाळ यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन हा मुंबईतून पुण्यातील नर्‍हे परिसरातील मामाकडे राहण्यासाठी आला होता. शुक्रवारी रात्री त्याचे मामाच्या मुलासोबत किरकोळ भांडण झाले. त्यामुळे चिडलेल्या मामा मेघनाथने गजाननला पट्टयाने मारहाण केली. त्यानंतरही मामाचा राग शांत न झाल्याने त्याने घरातील चाकूने गजाननच्या छातीत डाव्या बाजूला वार केला. त्याला चाकूने मारून गंभीर जखमी केले. त्यातच गजाननचा मृत्यू झाला. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी तातडीने आरोपी मामाला अटक केली आहे.

मनोरंजन

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top