Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

बनावट विदेशी दारूविरुद्ध धडक कारवाई

बनावट विदेशी दारूविरुद्ध धडक कारवाई

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सव्वासहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

marathinews24.com

बारामती – बनावट विदेशी दारूविरुद्ध धडक कारवाई – राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने तालुक्यात बनावट विदेशी दारूच्या विरुद्ध धडक कारवाई करून बनावट दारू व चारचाकी वाहनासह ६ लाख २२ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क बारामती विभागाचे निरीक्षक शहाजी शिंदे यांनी दिली आहे.

शिंदे यांनी वंजारवाडी गावाच्या हद्दीत भिगवण-बारामती रोड वरील हॉटेल ब्रम्हचैतन्य जवळ बारामती येथे गोपनीय खात्रीलायक माहितीनुसार एका संशयित चारचाकी मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट डिझायर गाडी थांबवून तपासणी केली असता, वाहनात बनावट विदेशी मद्याचे रॉयल स्टॅग व्हिस्कीचे आणि इम्पेरीयल ब्ल्यू व्हिस्कीचे प्रत्येकी १८० मिली क्षमतेचे ५ बॉक्स मिळून आल्याने दारूबंदी गुन्ह्याचा मुद्देमाल वाहनासह जप्त करून ताब्यात घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

जुनी वाहने खरेदी विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी पोलीस ठाण्याला माहिती देण्याचे आदेश – सविस्तर बातमी 

गुन्ह्यात आरोपी अमोल सदाशिव शिंदे (वय- 38 वर्षे रा. देवळाली ता. करमाळा जि. सोलापूर) यास अटक करून ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत उत्पादन शुल्क हडपसरचे उपअधीक्षक उत्तम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक शहाजी शिंदे, दुय्यम निरीक्षक सागर साबळे, गिरीशकुमार कर्चे, प्रदीप झुंजरुक, मयूर गाडे, सहायक दुय्यम निरीक्षक गणेश जाधव व जवान निखिल देवडे, सुरेश खरात, सागर दुबळे, संकेत वाझे, डी.जे. साळुंके यांनी भाग घेतला. पुढील तपास दुय्यम निरीक्षक सागर साबळे करीत आहेत, असे निरीक्षक शहाजी शिंदे यांनी कळविले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×