Breking News
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंदएकल महिलांना विकासात समान संधीसाठी सर्वांनी दृष्टिकोन सुधारावा – महापौर मंजुषा नागपुरे

कोंढव्यात अमली पदार्थ बाळगणाऱ्या दोन तस्करांना पकडले

मेफेड्रोन, ओझीकुश गांजा जप्त

marathinews24.com

पुणे – अमली पदार्थ बाळगणाऱ्या दोन तरुणांना वेगवेगळ्या कारवाईत अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. कारवाईसाठी लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेने पोलिसांना सहकार्य केले. तरुणांकडून ओझीकुश गांजा, मेफेड्रोन, मोटार, मोबाइल असा मुद्देमाल जप्त केला.
कोंढव्यातील धर्मावतनगर परिसरात एक तरुण मोटारीतून आला असून, त्याच्याकडे ओझीकुश गांजा (रासायनिक प्रक्रिया केलेला गांजा) असल्याची माहिती लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेेने (मिलिटरी इंटलिजन्स) गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विराेधी पथकाला दिली.

मोटारीची काच फोडून ५ लाखांचे जमीन मोजणीचे यंत्र चोरीला – सविस्तर बातमी

पोलिसांनी सापळा लावून अभिनव प्रदीप गुप्ता (वय २२, रा. लक्ष्मण पार्वती सोसायटी, शिवणे, एनडीए रस्ता ) याला पकडले. त्याच्याकडून ८ ग्रॅम ओझीकुश गांजा, मोबाइल संच असा ९६ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

कोंढव्यात अमली पदार्थ बाळगणाऱ्या दोन तस्करांना पकडले

अमली पदार्थ विरोधी पथकाने कोंढव्यात मेफेड्रोन बाळगणाऱ्या इर्शाद इफ्तीखार शेख (वय २७, रा. होमवुड सोसायटी, पारगेनगर, कोंढवा) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पाच लाखांचे मेफेड्रोन, मोटार, दोन मोबाइल, इलेक्ट्रिक वजन काटा, प्लास्टिक पिशवी असा सात लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

गु्न्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहायक निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस कर्मचारी विशाल दळवी, विनायक साळवे, मारुती पारधी, दयानंद तेलंगे, नागनाथ राख, नितीन जाधव, सचिन माळवे, प्रवीण उत्तेकर, सुहास डोंगरे, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, अक्षय शिर्के यांनी कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×