Breking News
दारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावापुण्यात समरसता लोककला संमेलनाचे २८ जूनला आयोजनइतिहासातून पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा घेण्याची गरज-प्र. के. घाणेकरदगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या नव्या विश्वस्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी फेटाळलीऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील खाशाबा जाधव पुरस्काराने गौरवित

ऑनलाइन पुजेच्या आमिषाने ५ लाखांचा गंडा

ऑनलाइन पुजेच्या आमिषाने ५ लाखांचा गंडा

सायबर चोरट्यांकडून फसवणूक

marathinews24.com

पुणे – ऑनलाइन पुजेच्या आमिषाने ५ लाखांचा गंडा – ऑनलाइन पुजेच्या आमिषाने एकाची ५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे घोरपडी परिसरात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर १७ जूनला संपर्क साधला. एका देवस्थानात देवीची पूजा करण्यात येणार आहे. भक्तांना या पूजेत सहभागी होता येणार असून, त्यासाठी काही रकम जमा करावी लागेल, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविला. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना ऑनलाइन पद्धतीने पैसे जमा करण्यास सांगितले. तक्रारदाराने चोरट्यांच्या खात्यात पैसे जमा केली. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून चोरट्यांनी तक्रारदाराकडून ५ लाख ३० हजार रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजीत आदमाने तपास करत आहेत.

गुंतवणुकीच्या आमिषाने ५ लाख ५६ हजार रुपयांची फसवणूक

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने एकाची ५ लाख ५६ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत एकाने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार हे आंबेगावमधील जांभुळवाडीत राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी तक्रारदारांच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला. शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले होते. त्यानंतर तक्रारदारांनी चोरट्यांच्या खात्यात सुरुवातीला काही रकम गुंतविली.

रक्कम गुंतविल्यानंतर चोरट्यांनी त्यांना परतावा दिला. परतावा दिल्यानंतर चोरट्यांनी त्यांना आणखी रकम गुंतविण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदारांनी चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी ५ लाख ५६ हजार रुपये जमा केले. रकम जमा केल्यानंतर चोरट्यांनी त्यांना परतावा दिला नाही, तसेच मुद्दलही दिली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यनंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×