Breking News
‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटन

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात

एका महिलेचा मृत्यू, २१ जखमी

marathinews24.com

लोणावळा : मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर खंडाळा बोरघाटात मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर नवीन बोगद्याजवळ शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास भीषण अपघात झाला. एका कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने त्याने समोरील वाहनांना धडक दिली. एका वाहनाला धडक बसल्यानंतर दुसऱ्या वाहनाने त्याच्या समोरील वाहनाला धडक दिली. अशा प्रकारे सुमारे २० ते २५ वाहनांना एकमेकांची धडक बसली. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून, २१ जण जखमी झाले आहेत. तसेच सर्व वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

मेफेड्रोन विक्री प्रकरणात महाविद्यालयीन तरुण गजाआड – सविस्तर बातमी

अनिता एकंडे असे या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. लोणावळा व खंडाळा परिसरात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणारा एक कंटेनर उतारावर त्याचा ब्रेक फेल झाल्याने समोर जाणाऱ्या वाहनांना धडक देत गेला. साधारणतः २० ते २५ वाहनांना धडक बसली असून, या अपघातात वेगवेगळ्या वाहनांमधील २१ जण जखमी झाले आहेत, तर एका स्कॉर्पिओ गाडीमधील महिला अनिता एकंडे यांचा मृत्यू झाला आहे.

या अपघातानंतर खालापूर टोलनाक्याच्या अलीकडे असलेल्या फुडमॉल हॉटेलपासून नवीन बोगद्यापर्यंतच्या पट्ट्यात अपघातग्रस्त वाहने विखुरलेली दिसत होते. यामुळे एक्सप्रेसवेवरील वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरू होती. परिणामी प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. अतिशय भीषण असा हा अपघात असून यामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघाताची माहिती समजताच खोपोली येथील हेल्प फाउंडेशन, खंडाळा बोरघाट पोलीस, आयआरबी, डेल्टा फोर्स खोपोली पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहनांमधील जखमींना बाहेर काढत उपचारासाठी खोपोली व कामोठे याठिकाणी रवाना केले.

मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर हा विचित्र व भीषण अपघात झाल्यामुळे या परिसरामधील वाहतूक ही विस्कळीत झाली होती. अपघातग्रस्त वाहने बाजूला केल्यानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरू करण्यात आली. या अपघात प्रकरणी खोपोली पोलीस पुढील तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×