Breking News
‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटन

मेफेड्रोन विक्री प्रकरणात महाविद्यालयीन तरुण गजाआड

साडेपाच लाखांचे मेफेड्रोन जप्त

marathinews24.com

पुणे – मेफेड्रोन विक्री करणाऱ्या तरुणाला अमली पदार्थ विरोधी पथकाने खराडी परिसरातून अटक केली. त्याच्याकडून ४ लाख ६३ हजारांचे २३ ग्रॅम १८ मिलीग्रॅम मेफेड्रोन, दुचाकी, मोबाइल असा ६ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हर्षवर्धन राहुल धुमाळ (वय २०, रा. पठारे वस्ती, दुर्गामाता मंदिराजवळ, चंदननगर, खराडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

पुणे विमानतळावर प्रवाशाकडून १० कोटींचा गांजा जप्त – सविस्तर बातमी

खराडी परिसरात अमली पदार्थ विरोधी पथक गस्त घालत होते. त्यावेळी काळूबाईनगर परिसरात एक तरुण वाहन क्रमांकाची पाटी नसलेली दुचाकी घेऊन थांबला असून, त्याच्याकडे मेफेड्रोन असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेण्यात आली. तेव्हा त्याच्याकडे मेफेड्रोन, प्लास्टिक पिशव्या सापडल्या. धुमाळ मेफेड्रोन कोणाला विकणार होता, तसेच त्याने मेफेड्रोन कोणाकडून आणले, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. धुमाळ एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहायक निरीक्षक अनिल सुरवसे, उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे, राहुल कोळपे, संदीप शिर्के, दयानंद तेलंगे, नागनाथ राख, सचिन माळवे, प्रवीण उत्तेकर, विशाल दळवी, संदेश काकडे, दत्ताराम जाधव यांनी ही कारवाई केली.

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाची २४ लाखांची फसवणूक

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने कोथरूड भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी २४ लाख ४४ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्येष्ठ नागरिकाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कोथरूड भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर फेब्रुवारी महिन्यात संदेश पाठविला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले होते. त्यानंतर ज्येष्ठाने चोरट्यांच्या खात्यात काही रकम जमा केली. चोरट्यांनी त्यांना परतावा दिला. परतावा मिळाल्यानंतर ज्येष्ठाचा विश्वास बसला. चोरट्यांनी त्यांना आणखी रकम गुंतविण्यास सांगितले. त्यानुसार ज्येष्ठाने चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी २४ लाख ४४ हजार रुपये जमा केली. मोठ्या प्रमाणावर रकम गुंतविल्यानंतर चोरट्यांनी त्यांना परतावा दिला नाही, तसेच त्यांंना मूळ मुद्दलही परत केली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×