मार्केटयार्डातील एमटीएम साईटवरील घटना
marathinews24.com
पुणे – डोक्यात दगड पडून तरूण मजूर ठार – बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षिततेची काळजी न घेतल्यामुळे, बेसमेंट रिर्टनिंग वॉल वॉटर पु्रुफिंगवेळी दगड डोक्यात पडून तरूण मजूर ठार झाला आहे. याप्रकरणी हलगर्जीपणा बाळगल्याप्रकरणी ६ जणांविरूद्ध मार्वेâटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २४ जुलैला दुपारी बाराच्या सुमारास गंगाधाम चौकातील एमटीएम साईटवर घडली आहे.
पुण्यात एसटी स्थानक परिसरात अभियंत्याला लुटले – सविस्तर बातमी
कुश दुर्लभ बरमन (वय २२ रा. पश्चिम बंगाल) असे ठार झालेल्या मजूराचे नाव आहे. याप्रकरणी चेतन शांतीलाल मेहता, सचिन कणसे, स्वप्नील गाडे, शितल शहा, किरण भोसले, रमेश गोदुरे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार विजय उत्तेकर यांनी फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्केटयार्ड परिसरातील गंगाधाम परिसरात एमटीएम कंपनीकडून इमारतीचे बांधकाम सुरू होते. २४ जुलैला दुपारी बाराच्या सुमारास मजूर कुश बरमन त्याठिकाणी काम करीत होता. त्यावेळी संबंधित ठिकाणी कंपनीसह ठेकेदाराकडून कामगाराच्या सुरक्षिततेबाबत काळजी घेतली नाही. त्यामुळे बेसमेंट रिर्टनिंग वॉल वॉटर पु्रुफिंगवेळी दगड डोक्यात पडून तरूण मजूर गंभीररित्या जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने तपास करीत आहेत.
मोटारीची काच फोडून लॅपटॉप, मोबाइल चोरीला
मोटारीची काच फोडून चोरट्यांनी लॅपटॉप, मोबाइल, हॉर्डडिस्क असलेली पिशवी अशी मिळून ४५ हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना २६ जुलैला संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास नवीन जिल्हा परिषदेजवळ घडली आहे. याप्रकरणी जयवंत मदन पवार (वय ५० रा. वारजे ) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार पवार हे वारजेत राहायला असून, २६ जुलैला कामानिमत्त त्यांनी नवीन जिल्हा परिषदेवजवळ मोटार उभी केली होती. संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या मोटारीची काच फोडून लॅपटॉप, मोबाइल, हॉर्डडिस्क असलेली पिशवी अशी मिळून ४५ हजारांचा ऐवज चोरून नेला. गाडीजवळ आल्यानंतर पवार यांना चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते तपास करीत आहेत.




















