Breking News
पत्नीच गळा दाबुन जीवे मारण्याचा प्रयत्नमागील पाच वर्षांत टँकरद्वारे पाणीपुरवठा झालेल्या गावांचा जलयुक्त शिवार तीनमध्ये प्राधान्य मिळणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपुण्यात राहुल गांधीच्या “छात्रों की गुंज” कार्यक्रमासाठी अटी घालून परवानगीव्हाट्सएपच्या स्टेट्समुळे पुण्यात अल्पवयीन मुलाचा निर्घुन खूनकोरेगाव भीमा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा मार्ग मोकळापुण्यात आध्यात्मिक गुरहणे तरूणीचे अर्धनग्न फोटो मागून घेतलेसुकन्या समृद्धी योजनेत मुलींच्या भविष्यासाठी गुंतवणुकीचे आवाहनपिंपरी चिंचवड परिसरातील भूसंपादनाची प्रलंबित कामे ३१ ऑक्टोबर पूर्वी पूर्ण करावेतवयस्कर  शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरणाची विशेष सुविधासहकारनगरात स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; ५ महिलांची सुटका

पुण्यात एसटी स्थानक परिसरात अभियंत्याला लुटले

सराईत चोरटा गजाआड

marathinews24.com

पुणे – पुण्यात एसटी स्थानक परिसरात अभियंत्याला लुटले – बुद्धीबळ स्पर्धेसाठी शहरात आलेल्या अभियंत्याला गजाने मारहाण करुन त्याच्याकडून ऑनलाइन पद्धतीने रक्कम वर्ग करून घेणार्‍या चोरट्याला खडकी पोलिसांनी काही तासांतच अटक केली आहे. मुंबई-पुणे रस्त्यावरील शिवाजीनगर एसटी स्थानकासमोर ही घटना घडली. अक्रम सलीम मुलाणी (वय २५, रा. कागदीपुरा, कसबा पेठ) असे अटक केलेल्या सराइताचे नाव नाव आहे. मुलाणीविरुद्ध यापूर्वी अदखलपात्र गुन्हे दाखल आहेत. सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करणे, तसेच धमकाविण्याचे गुन्हे त्याच्याविरुद्ध दाखल आहेत. अभियंता तरुणाने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

लहान भावाचा खून करणाऱ्या आरोपीला बेड्या – सविस्तर बातमी

तक्रारदार ३१ वर्षीय तरुण मूळचा अकोल्याचा असून, पुण्यात आयोजित केलेल्या बुद्धीबळ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तो आला होता. २५ जुलैला तो वाकडेवाडी येथील शिवाजीनगर स्थानकाजवळ सकाळी साडेसहाच्या सुमारास थांबला होता. त्यावेळी बसस्थानकाजवळ थांबलेल्या तरुणाला मुलाणीने धमकाविण्यास सुरुवात केली. त्याला गजाने मारहाण करुन त्याच्याकडून ऑनलाइन पद्धतीने २ हजार रुपये घेतले. मुलाणी तेथून पसार झाला. घाबरलेल्या तरुणाने खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रमसिंह कदम यांनी तपास पथकातील पोलीस कर्मचार्‍यांना पसार झालेल्या चोरट्याला पकडण्याच्या सूचना दिल्या.

पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले आणि पथकाने एसटी स्थानक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांनी केलेले चित्रीकरण तपासले. पोलीस कर्मचारी सुधाकर राठोड आणि गालिब मुल्ला यांना काही तासातच संशयित आरोपीची ओळख पटविली. आरोपी मुलाणी हा भवानी पेठ परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तपास पथकाने त्याला भवानी पेठेतून अटक केली. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रमसिंह कदम, पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले, शशी सपकाळ, प्रताप केदारी, शशांक डोंगरे, दिनेश भोई, अनिकेत भोसले, ऋषिकेश दिघे, सुधाकर राठोड, गालिब मुल्ला यांनी ही कामगिरी केली.

आरोपीची एसटी स्थानक परिसरात काढली धिंड

आरोपी अक्रम मुलाणी हा सार्वजिनक ठिकाणी दहशत माजवितो. यापूर्वी त्याच्याविरुद्ध अशा प्रकारचे गुन्हे दाखल झाले होते. खडकी पोलिसांच्या पथकाने अटक केलेल्या मुलाणीला शिवाजीनगर एसटी स्थानक परिसरात नेले. त्याठिकाणी त्याची धिंड काढली. मुलाणी याच्याविरुद्ध तक्रार असल्यास नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार करावी, असे आवाहन पोलिसांनी आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×