Breking News
‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटन

लहान भावाचा खून करणाऱ्या आरोपीला बेड्या

ताम्हिणी घाटातील तरुणाच्या खून प्रकरणाचा उलगडा

marathinews24.com

पुणे – लहान भावाचा खून करणाऱ्या आरोपीला बेड्या – ताम्हिणी घाटात बेवारस अवस्थेत सापडलेल्या तरुणाच्या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणात वारजे माळवाडी पोलिसांनी खुन झालेल्या तरुणाच्या मोठ्या भावाला अटक केली आहे. व्यसनांच्या आहारी गेलेल्या लहान भावाशी झालेल्या वादातून त्याचा खून करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

पुण्यात रेव्ह पार्टीवर छापा; बड्या राजकीय नेत्याचा जावई सामील – सविस्तर बातमी

ऋषिकेश अनिल शिर्के (वय २३, रा. गायकवाड चाळ, मावळे आळी, कर्वेनगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी ऋषीकेशचा मोठा भाऊ अनिकेत अनिल शिर्के (वय २६) याला अटक करण्यात आली. शनिवारी सकाळी ताम्हिणी घाटात बेवारस अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह सापडल्याची माहिती पौड पोलिसांना मिळाली हाेती. खून झालेल्या तरुणाची ओळखही पटलेली नव्हती. पौड पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत होता. आरोपी अनिकेतने लहान भाऊ ऋषीकेश याचा ताम्हिणी घाटात खून केल्याची माहिती वारजे माळवाडी पोलीस ठण्यातील उपनिरीक्षक सचिन तरडे यांना खबऱ्याने दिली.

पोलिसांच्या पथकाने अनिकेतचा शोध घेण्यास सुरुवात केली. अनिकेत हा कर्वेनगरमधील वनदेवी मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या टेकडीच्या परिसरात लपून बसला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने लहान भावाचा खून केल्याची कबुली दिली. अनिकेत आणि ऋषिकेश शुक्रवारी (२५ जुलै) रात्री कर्वेनगर येथून दुचाकीवरून रत्नागिरीतील लांजा तालुक्यातील गोळवशी-शिर्केवाडी येथे देवदर्शनासाठी निघाले. दोघे मध्यरात्री ताम्हिणी घाटातील गोणवडी गावाजवळ थांबले. ऋषिकेशला दारू आणि गांजाचे व्यसन होते. अनिकेतने ऋषीकेशला व्यसन सोडण्यासस सांगितले. या कारणावरुन दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर रागाच्या भरात अनिकेतने ऋषीकेशनवर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. ऋषीकेशचा मृत्यू झाल्यानंतत अनिकेत पसार झाला.

भावाच्या गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी मृतदेहाचा शोध सुरू केला. वारजे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश धेंडे यांनी पौड पोलिसांशी संपर्क साधला. त्या वेळी शनिवारी पहाटे गोणवडी परिसरात एक अनोळखी तरुणाचा मृतदेह सापडल्याचे पौड पोलिसांनी सांगितले. आरोपी अनिकेतला पौड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पाैड पोलिसांकडून याप्रकरणात तपास करण्यात येत आहे. परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने ही कामगिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×