पुण्यात रेव्ह पार्टीवर छापा; बड्या राजकीय नेत्याचा जावई सामील

७ जण ताब्यात; दोन तरुणींचा समावेश

marathinews24.com

पुणे – उच्चभ्रू सोसायटीतील सदनिकेत सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री छापा घालून कारवाई केली. या पार्टीत अमली पदार्थ, दारु, हुक्काचे सेवन केले जात असल्याचे उघडकीस आले आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या बड्या नेत्याच्या जावयाचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.

अमली पदार्थ आणि दहशतवाद एकाच नाण्याच्या दोन बाजू-प्रा.डॉ. मिलिंद भोई – सविस्तर बातमी

गुन्हे शाखेने खराडी परिसरातील एका तारांकित हॉटेलजवळ असलेल्या उच्चभ्रू सोसायटीतील सदनिकेत छापा टाकून सात जणांना ताब्यात घेतले. यामध्ये दोन महिलाचा समावेश आहे. रेव्ह पार्टीत प्रांजल खेवलकर सामील झाले होते. खेवलकर हे एका बड्या राजकीय नेत्याचे जावई असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख यांनी दिली.

खराडी भागातील एका सदनिकेत ‘हाऊस पार्टी’च्या नावाखाली रेव्ह पार्टी सुरु असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. मध्यरात्रीनंतर पोलिसांनी तेथे छापा टाकला़ तेथे पाच जण आणि दोन महिला पार्टी करतान आढळून आले़ पार्टीत अमली पदार्थ, दारु, हुक्का याचे सेवन केले जात असल्याचे दिसून आले़ ही पार्टी खेवलकर यांनी आयोजित केले असल्याची माहिती मिळाली आहे.

खेवलकर हे एकनाथ खडसे यांची कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती आहेत. पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात नेण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×