नांदण्यास नकार दिल्याने पत्नीचा खून

नांदण्यास नकार दिल्याने पत्नीचा खून, लोहगावमधील घटना

लोहगावमधील घटना

marathinews24.com

पुणे – नांदण्यास नकार दिल्याने पत्नीचा खून – कौटुंबिक वादातून नांदण्यास नकार दिल्याने चिडलेल्या पतीने पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करुन तिचा खून केल्याची घटना लोहगाव भागात घडली. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी पतीला अटक केली. ममता प्रेम जाधव (वय २१, रा. काजळी तांडा, पिंपळगाव, ता. जिंतूर, जि. परभणी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पती प्रेम उत्तम जाधव (वय २७, रा. काजळी तांडा, पिंपळगाव, ता. जिंतूर, जि. परभणी) याला अटक करण्यात आली. याबाबत ममताची मावशी रेश्मा रामेश्वर राठोड (वय २८, रा. खांदवेनगर, लोहगाव) हिने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

लोकमान्यनगरमध्ये घरफोडी, ७ लाखांचे दागिने लंपास – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ममताचा पती प्रेम याच्याशी वाद झाला होता. ममता परभणी जिल्ह्यातील काजळी तांडा परिसरात राहत होता. सततच्या वादामुळे ममता पती प्रेमचे घर सोडून पुण्यातील लोहगाव परिसरात राहणारी मावशी रेश्मा राठोड हिच्याकडे राहण्यास आली. गेल्या काही दिवसांपासून प्रेम तिला नांदण्यासाठी आग्रह करत होता. तिने नांदण्यास नकार दिला होता. या कारणावरुन प्रेम तिच्यावर चिडला होता.

प्रेम गावाहून रविवारी दुपारी ममताच्या मावशीच्या घरी आला. त्याने ममताला सासरी नांदायला ये, असे सांगितले. ममताने त्याला नकार दिल्यानंतर त्यांच्यात वादावादी झाली. प्रेम याच्याकडे चाकू होता. खिशात लपवलेला चाकूने त्याने ममताच्या गळ्यावर वार केला. गळा चिरल्याने ममता गंभीर जखमी झाली. त्यानंतर तो पसार झाला. गंभीर जखमी अवस्थेतील ममताला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. रात्री उशीरा या प्रकरणी खुनाचा गु्न्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेला आरोपी प्रेम याला रात्री अटक करण्यात आली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शेळके तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×