Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

घरफोडी करणार्‍या सराईत त्रिकुटाला बेड्या

घरफोडी करणार्‍या सराईत त्रिकुटाला बेड्या

समर्थ पोलिसांची कामगिरी, साडेचार लाखांचा ऐवज जप्त

marathinews24.com

पुणे – घरफोडी करणार्‍या सराईत त्रिकुटाला समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ४ लाख ५७ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. चोरट्यांकडून १० हजारांची रोकड, वाहन, हत्यार जप्त केले आहे. त्यांनी बंद घराचे कुलूप तोडून रोकड, सोन्याचे दागिने असा ऐवज चोरून नेल्याची घटना २५ जूनला घडली होती. रोहीत उर्फ विनायक प्रमोद भोंडे (वय २१ रा.लक्ष्मीनगर, येरवडा ) रोहीत उर्फ रावन नानाभाऊ लंके (वय २४ रा. कस्तुरबा हाऊसिंग सोसायटी विश्रांतवाडी) निखील परशुराम खांडेकर (वय २० रा. लक्ष्मीनगर येरवडा) अशी अटक केलेल्या सराईतांची नावे आहेत.

रिक्षाचालकासह साथीदारांनी तरूणाला लुटले – सविस्तर बातमी 

घरफोडीच्या दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने समर्थ पोलिसांच्या तपास पथकाने हद्दीतील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यानुसार संबंधित चोरी सराईत चोरट्यांनी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने तिघांना ताब्यात घेत चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. २४ जुलैला तिन्हीही सराईतांना अटक केली. ही कामगिरी उपायुक्त कृषिकेश रावले, एसीपी अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक चेतन मोरे यांच्या मार्गदर्शनानुसार उपनिरीक्षक जालिंदर फडतरे, पोलीस अंमलदार संतोष पागार, औचरे, रोहीदास वाघेरे, इम्रान शेख, शिवा कांबळे, अमोल गावडे, शरद घोरपडे, भाग्येश यादव यांनी केली.

तिघेही आरोपी सराईत, तब्बल २९ गुन्हे दाखल

अटक केलेल्या तिन्हीही आरोपीविरूद्ध चोरी, घरफोडी, शरीराविरूध्दचे अपराधासारखे तब्बल २९ गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपी रोहीत नानाभाऊ लंके याला ३ मे २०२४ रोजी पुणे जिल्हा व पिंपरी चिचंवड हद्दीतुन दोन वर्षांसाठी तडीपार केले होते. त्यानंतरही त्याने तडीपार आदेशाचा भंग करून शहरात प्रवेश करून घरफोडीचा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी दिली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×