सिंहगड रस्ता, कोंढवा भागात घरफोडी

कोंढव्यात इराणी महिलेची पर्स चोरीला - अमेरिकन डॉलर, सोन्याची अंगठी लंपास

कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – सिंहगड रस्ता, तसेच बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावरील सोसायटीत झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी ११ लाख रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध पर्वती आणि कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंहगड रस्त्यावरील गणेशमळा भागात एका सोसायटीत सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी आठ लाख ६५ हजारांचे सोन्याचे दागिने लांबविले. याबाबत एका महिलेने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

नात्यातील महिलेची छेड काढल्याने केला खून – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला गणेशमळा भागातील ओैंदुबर सोसायटीत राहायला आहेत. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून आठ लाख ६५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना नुकतीच घडली. पोलीस उपनिरीक्षक किरण पवार तपास करत आहेत.बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावरील मोरयानगरी सोसायटीत सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन लाख २८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. याबाबत एका महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आणि कुटुंबीय सोमवारी (११ ऑगस्ट) सकाळी सदनिका बंद करून बाहेर गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून कपाटातील दोन लाख २८ हजारांचे सोन्याचे दागिने लांबविले. पोलीस हवालदार मेमाणे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×