Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

रेल्वे प्रवाशी महिलेच्या पिशवीतून दागिन्यांची चोरी

रेल्वे प्रवाशी महिलेच्या पिशवीतून दागिन्यांची चोरी

सराईत चोरट्याला दिल्लीतून अटक

marathinews24.com

पुणे – महिला रेल्वे प्रवाशाला मदतीच्या बहाण्याने तिच्या बॅगेतून दागिन्यांची चोरी करणाऱ्या सराईताला पुणे रेल्वे पोलीसांनी दिल्लीतून अटक केली आहे. त्याच्याकडून दोन गुन्ह्यातील तब्बल ११० ग्रॅम किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. रमेश उर्फ मोटा (रा. न्यु अनाज मंडी, नजफगढ, दिल्ली) असे अटक केलेल्या सराईताचे नाव आहे.

पाणी पुरवठा योजनांच्या कामांना गती देण्याकरिता समन्वयक अधिकाऱ्यांची नेमणूक करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी – सविस्तर बातमी 

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला दोन मुलांसह २५ मे रोजी वेरावळ–पुणे एक्सप्रेस रेल्वे गाडीने प्रवास करीत होती. सकाळी साडेसातच्या सुमारास शिवाजीनगर स्थानकात उतरण्यासाठी महिला दरवाज्याजवळ बॅग्ज घेऊन उभी होती. त्यावेळी चार अनोळखीनी महिलेला मदतीचा बहाणा करीत त्यांच्या बॅगमधून ५२ ग्रॅम सोन्याच्या बांगड्या व मुलाची १ ग्रॅम सोन्याची अंगठी असे ५३ ग्रॅम दागिने चोरून नेले होते. याप्रकरणी गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा लोहमार्ग यांच्याकडून करण्यात येत होता.

लोहमार्ग पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे रमेश उर्फ मोटा (रा. न्यु अनाज मंडी, नजफगढ, दिल्ली) याने हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार विशेष पथकाने दिल्लीत धाव घेत क्राइम ब्रांच दिल्ली व आरपीएफ यांच्या मदतीने आरोपीला अटक केली. चौकशीत त्याने पुण्यातील गुन्ह्याबरोबरच मिरज रेल्वे स्टेशन परिसरात दुसऱ्या दिवशी अशाच प्रकारे चोरी केल्याची कबुली दिली. दोन्ही गुन्ह्यात त्याच्याकडून ११० ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक इरफान शेख, सहायक पोलीस निरीक्षक प्रभाकर कापुरे, उपनिरीक्षक सुनील माने, दिपक धिवार, सुरेश रासकर, दिपक ठोंबरे, संदिप काटे, प्रशांत डोईफोडे, उदय चिले, अमित गवारी, मिथुन जानकर, रितेश राठोड यांनी केली.

सराईत अशी करत होता चोरी

प्रवाशांना बॅग उचलण्यास मदत करण्याचा बहाणा करून आरोपी बॅगची चैन उघडून मौल्यवान दागिने चोरत होता. प्रवाशांनी अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये. आपले साहित्य स्वतःजवळ सुरक्षित ठेवावे, असे आवाहन लोहमार्ग पोलिसांनी केले आहे. रेल्वे प्रवासादरम्यान महिलेला मदतीच्या बहाण्याने बॅगेतून चोरी करणाऱ्या आरोपीला पुणे लोहमार्ग पोलिसांनी दिल्लीतून अटक केली आहे. त्याच्याकडून दोन गुन्ह्यातील ११० ग्रॅम दागिने जप्त केले असून याप्रकरणी आणखी तपास करण्यात येत आहे. – रोहिदास पवार, अपर पोलीस अधीक्षक, पुणे लोहमार्ग

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×