मनोज जरांगे कडून आर-पार लढाईची घोषणा
marathinews24.com
पुणे – (रेवण कोळेकर) : आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज बीडमध्ये मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्याला हात घालत भाष्य केले. मनोज जरांगे हे मुंबईत जाण्यावर ठाम असून यावेळी नेमक्या कोणत्या मागण्या आहेत? याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत दिली.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाची तीव्रता वाढवत मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केलं आहे की, राज्यातील सर्व मराठा समाजबांधवांनी आपले व्यवसाय, नोकऱ्या आणि कामधंदे थांबवून मुंबईकडे जायचं आहे. जगाच्या पाठीवर होणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्याला तुम्ही उपस्थित राहा, असं त्यांनी सांगितलं. २७ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्र गणेशोत्सवाच्या स्वागतामध्ये व्यस्त असतानाच, जरांगे पाटील आपल्या समर्थकांसह अंतरवाली सराटीतून मुंबईकडे जाणार आहेत. २९ ऑगस्टला गणपती घेऊनच मुंबईत प्रवेश करायचा असा निर्धार मनोज जरंगी यांनी केला आहे.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे यांनी सरकारसमोर आपले नेमके मुद्दे मांडले, आंदोलनाची पुढील दिशा, मागण्या आणि सरकारकडून काय मिळवायचं आहे याबाबतची माहिती दिली.
नेमक्या कोणत्या मागण्या करत आहेत, मनोज जरांगे पाटील?
१) मराठा कुणबी हे एकच आहेत, याची अंमलबजावणी झाली पाहिजे.
२) सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करावे. गेल्या १३ महिन्यापासून सरकारचा अभ्यासच सुरू आहे, असेही मनोज जरांगे म्हणाले.
३) ज्यांची ज्यांची कुणबी नोंद सापडली आहे, त्यांचे सगे सोयरे ही करून घ्या. सगे सोयरे हे पोटजात म्हणून घ्या, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे.
४) आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या.
५) आमच्यावर मार खाऊन केसेस झाल्या, अजूनही केसेस मागे घेतल्या नाहीत, ज्या मराठा बांधवांनी आरक्षणासाठी बलिदान दिले आहे त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले आहेत. असेही मनोज जरांगे म्हणाले.
मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनाचा मार्ग असा असणार…
● आंतरवाली सराटी वरून २७ ऑगस्ट रोजी १० वाजता निघणार – पुढे पैठण, शेवगाव,(अहिल्यानगर) कल्याण फाटा, आळेफाटा, शिवनेरी, (जुन्नर मुक्कामी…)
● २८ ऑगस्टला खेड मार्गे चाकण, लोणावळा, वाशी, चेंबूर – पुढे २८ ऑगस्ट रोजी आझाद मैदानावर पोचणार…
● २९ ऑगस्टला सकाळी दहा वाजता आझाद मैदानावर आंदोलन सुरू करणार…
कुणबी आणि मराठा एकच आहेत, त्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे, याशिवाय आम्ही मुंबईत सोडणार नाही. हैदराबाद गॅझेट लागू करा अशी त्यांनी मागणी केली. गेल्या १३ महिन्यापासून सरकारचा अभ्यास सुरू आहे, आम्हाला सातारा बॉम्बे गॅझेट लागू करावं, सरकारने मराठ्यांचा विषय समजून घेतला पाहिजे. मराठा समाज हा अजूनही संयमी असून आता आंदोलन खूप पुढे गेलं आहे, त्यामुळे राज्य असतील करू नका असं आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.























