पुण्यात वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू

दुचाकीच्या धडकेत महिलेचा मृत्यू

जंगली महाराज रस्ता आणि कोंढवा परिसरात अपघाताच्या घटना

marathinews24.com

पुणे – शहरात वेगवेगळ्या अपघातात पादचारी महिलेसह दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. जंगली महाराज रस्ता आणि कोंढवा परिसरात अपघाताच्या घटना घडल्या. जंगली महाराज रस्त्यावर भरधाव वाहनाच्या धडकेत पादचारी महिला गंभीर जखमी झाल्याची घटना ३१ मे रोजी घडली होती. उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांकडून दिलेल्या फिर्यादीनुसार या प्रकरणी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पुण्यात पीएमपीएल चालकाला ह्रदयविकाराचा झटका, वाहतूक पोलिसांनी वाचवले प्राण – सविस्तर बातमी 

जंगली महाराज रस्त्यावरुन ३१ मे राेजी रात्री नऊच्या सुमारास सुमन भालेराव निघाल्या होत्या. जंगली महाराज मंदिर परिसरात रस्ता ओलांडणाऱ्या भालेराव यांना धडक देऊन वाहन चालक पसार झाला होता. याबाबत पोलीस शिपाई गणेश बेडवाल यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक हिरे तपास करत आहेत.

कोंढव्यातील टिळेकरनगर परिसरात डंपरच्या चाकाखाली सापडून ज्येष्ठाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (२५ ऑगस्ट) दुपारी घडली. या प्रकरणी डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालिंदर दादा चौधरी (वय ६०, रा. टिळेकरनगर, कोंढवा) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठाचे नाव आहे. या प्रकरणी डंपर चालक अंकुश रावसाहेब कोकरे (वय ३६, रा. टिळेकनगर, कोंढवा ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत संदीप जालिंदर चौधरी (वय ४२, रा. पद्मावतीनगर, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. जालिंदर चौधरी हे सोमवारी दुपारी घरासमोर थांबले होते. त्या वेळी डंपर चालक कोकरे डंपर मागे घेत होता. डंपरच्या चाकाखाली सापडून चौधरी यांचा मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक थोरात तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×