Breking News
‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटन

पुण्यात गणेशोत्सवात मद्य विक्री बंदीला उच्च न्यायालयाकडून स्थगिती

पुण्यात गणेशोत्सवात मद्य विक्री बंदीला उच्च न्यायालयाकडून स्थगिती

उत्सवाच्या काळात दहा दिवस मद्य विक्री दुकाने बंद घेण्याच्या आदेशाल स्थगिती

marathinews24.com

पुणे – गणेशोत्सवाच्या शहरातील मध्य भागातील मद्य विक्रीची दुकाने दहा दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पुणे शहरातील खडक, विश्रामबाग, फरासखाना पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवण्याबाबतच्या निर्णयाला शहरातील बार अँड रेस्टोरंट चालक संघटनेने उच्च न्यायालायात याचिका दाखल करुन आव्हान दिले होते. याचिकेवर मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. उत्सवाच्या काळात दहा दिवस मद्य विक्री दुकाने बंद घेण्याच्या आदेशाल स्थगिती देण्यात आली. त्यानुसार आता जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सुधारित आदेश दिले. त्यानुसार मध्य भागातील मद्य विक्री दुकाने गणेश चतुर्थी (२७ ऑगस्ट), गौरी आगमन (३१ ऑगस्ट), गौरी विसर्जन (२ सप्टेंबर) आणि विसर्जन सोहळ्याच्या (६ सप्टेंबर) दिवशी बंद राहणार आहेत.

डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या घरी श्री गणेशाची प्रतिष्ठापना; शेतकरी, महिला सुरक्षितता आणि राज्याच्या प्रगतीसाठी केली प्रार्थना – सविस्तर बातमी 

वैभवशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सवात मध्य भागात मोठ्या संख्येेने भाविक येतात. उत्सवाच्या कालावधीत दररोज लाखो भाविकांची दर्शनासाठी येतात. परगाव, तसेच परराज्यातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. उत्सवाच्या कालावधीत घडणारे गैरप्रकार, वाद, तसेच भांडणाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांंनी शहराच्या मध्य भागातील मद्य विक्रीची दुकाने दहा दिवस बंद ठेवण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला होता. प्रस्तावाला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली होती. त्यानुसार गेल्या वर्षी उत्सवाच्या काळात संपूर्ण दहा दिवस खडक, विश्रामबाग, फरासखाना पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील मद्य विक्री दुकाने (बार अँड रेस्टोरंट, वाईन शाॅप) बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. यावर्षी मध्य भागातील मद्य विक्री दुकाने दहा दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते.

या निर्णयास बार अँड रेस्टाेरंट संघटना आणि मद्य विक्रेत्यांनी विरोध दर्शविला होता. मद्य विक्रेत्यांकडून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी झाली. त्यानंतर उच्च न्यायालयाने मध्य भागातील मद्य विक्रीचे दुकाने दहा दिवस बंद ठेवण्याचा आदेशाला स्थगिती दिली. त्यानुसार संपूर्ण दहा दिवस मद्य विक्री बंदीचा आदेश फेटळण्यात आल्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सुधारित आदेश काढला. त्यानुसार मध्य भागातील मद्य विक्री दुकाने प्राणप्रतिष्ठापना सोहळा (२७ ऑगस्ट), गौरी आगमन (३१ ऑगस्ट), गौरी विसर्जन (२ सप्टेंबर) आणि विसर्जन सोहळ्याच्या (६ सप्टेंबर) दिवशी बंद राहणार आहेत.

गणेश चतुर्थी (२७ ऑगस्ट) आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी (६ सप्टेंबर) या दोन्ही दिवशी संपूर्ण जिल्ह्यातील मद्य विक्री दुकाने बंद (ड्राय डे) ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, तसेच ७ सप्टेंबर रोजी विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत पुणे महापालिका क्षेत्रातील मिरवणुकीच्या मार्गावरील सर्व मद्य विक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय ज्या भागात पाचव्या आणि सातव्या दिवशी विसर्जन पार पडते, त्या भागातील मिरवणुकीच्या मार्गावरील दुकाने मिरवणुकीदरम्यान बंद ठेवण्याचे आदेशही लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी (२६ ऑगस्ट) रोजी सुधारित आदेश दिले आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×