डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या घरी श्री गणेशाची प्रतिष्ठापना

डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या घरी श्री गणेशाची प्रतिष्ठापना

शेतकरी, महिला सुरक्षितता आणि राज्याच्या प्रगतीसाठी केली प्रार्थना

marathinews24.com

पुणे – गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर सिल्व्हर रॉक्स, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर येथील निवासस्थानी महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि त्यांची भगिनी श्रीमती जेहलम जोशी यांनी श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली. जवळपास ५० वर्षांची ही परंपरा त्यांच्या आई- वडिलांनी डॉ. दिवाकर गोऱ्हे व लतिका गोऱ्हे यांनी सुरू केली होती. आजही ती भावपूर्णपणे पुढे नेली जात आहे. याप्रसंगी घरातील आरास पर्यावरणपूरक ठेवण्यात आली होती. मोदकाद्वारे भारताच्या समृद्धीचे प्रतीक मांडले गेले, तर पाठीमागील धनुष्यबाण व त्रिशूलाच्या सजावटीतून सामर्थ्य आणि श्रद्धेचा संगम व्यक्त करण्यात आला. ही आरास केवळ सजावट नसून श्रद्धा, कृतज्ञता आणि प्रगतीची प्रार्थना असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

कृषी क्षेत्रात एआय वापरासाठी ५०० कोटी रुपये-उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा – सविस्तर बातमी 

गणरायाच्या चरणी प्रार्थना करताना त्यांनी शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाची मनोकामना केली. यावर्षी पाऊस समाधानकारक झाला असला तरी काही भागांत शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. बळीराजाला सुख-समाधान मिळो, शेतीच्या उत्पादनास योग्य भाव मिळो आणि नवी उभारी घेण्यासाठी बाप्पाचे आशीर्वाद लाभोत. तसेच विद्यार्थी, महिला आणि कामगार यांचे जीवन सुजलाम-सुफलाम व्हावे,” असे त्यांनी नमूद केले. महिलांच्या सुरक्षिततेवर भर देत डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की,‘लाडकी बहीण योजना’ ही महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी महत्त्वाची दिशा आहे. गावपातळीवर महिलांना सुरक्षितता, नेतृत्व आणि प्रगतीची संधी मिळावी, ही आमची गणरायाकडे प्रार्थना आहे.”

राज्याच्या महायुती सरकारसाठी प्रार्थना करताना त्यांनी सांगितले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सर्वांगीण विकासाच्या मार्गावर आहे. या तिघा नेत्यांमध्ये कायम जिव्हाळा , मैत्री आणि सलोखा टिकून राहावा, जेणेकरून ते एकसंघपणे कार्य करून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकतील.” त्याचबरोबर, केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताला जागतिक पातळीवर प्रगती व सामर्थ्य प्राप्त होवो, अशीही त्यांनी प्रार्थना केली. गणरायाच्या आगमनानंतर लवकरच गौरी पूजनाचा मंगल सोहळा होणार असून कौटुंबिक ऐक्य आणि समाजातील स्त्रीशक्तीचे प्रतीक म्हणून तो साजरा केला जाणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×