पुण्यात गणशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर २६ सराईत तडीपार

दरोड्यापुर्वीच पुणे पोलिसांनी तीन टोळ्यांचा डाव उधळला

परिमंडळ चारच्या हद्दीतील गुंडांविरूद्ध कारवाई

marathinews24.com

पुणे – गणशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून खबरदाराचा उपाय म्हणून सराईतांना तडीपार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने परिमंडळ चारमधील बाणेर, चतुःशृंगी, येरवडा, चंदननगर, खराडी, वाघाली, लोणीकंद पोलीस ठाण्यातंर्गत २६ सराईतांना तडीपार करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांनी दिले आहेत. सर्वाधिक तडीपारांमध्ये येरवडा परिसरातील सराईत गुंडांचा समावेश आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तीन गुंड तडीपार – सविस्तर बातमी 

परिमंडळ चारमधील तडीपार केलेल्या गुंडांची नावे

शिवाजी लक्ष्मण रामावत (वय ३० रा. लमाणतांडा, पाषाण), सचिन अशोक रणपिसे (वय २० रा. लक्ष्मीनगर, येरवडा), सुरज उर्फ किल्या वैâलास बाणेकर (वय ३५ रा. येरवडा) मोहम्मद उर्फ रहिम रहेमान शेख (वय १९ रा. येरवडा) सलमान चाँदबाशा शेख (वय ३० रा. वाघोली) महेश बलभिम सरोदे (वय २२ रा. येरवडा) सुंदर उर्फ कुबड्या राजाराम मेत्रोळ (वय ३५ रा. पर्णकुटी येरवडा), नंदकुमार संजय पासंगे (वय २२ रा. कामराजनगर येरवडा) आशा सिताराम राठोड (वय ४८, रा. येरवडा) शांताबाई गोविंद राठोड (वय ५० रा. नाईकनगर, येरवडा) नीता सुनील नगरकर (वय ६३ रा. वडगावशेरी) गणेश प्रकाश जाधव (वय १९ रा. बाणेर) प्रेम विकी ससाणे (वय १९ रा. येरवडा) मानकीबाई कमलेश चव्हाण (वय ५० रा. येरवडा), सोनीबाई बासू राठोड (वय ६०, येरवडा) मुन्नीबाई रेड्डी राठोड (वय ५० रा. नाईकनगर, येरवडा)

अंबु राजू धोत्रे (वय ४९ रा. गोखलेनगर) गणेश उत्तम वाघमारे (वय २२ रा. चंदननगर) निलेश राहूल वाघमारे (वय २५ रा. थिटे वस्ती, खराडी) सत्यम राजू चमरे (वय २४ रा. पेरणे, हवेली) मोहम्मद हुसेन खान (वय २२ रा. गाडीतळ, येरवडा) गोपाळ संजय यादव (वय २६ रा. बकोरी रोड, वाघोली), शशि पांडू चव्हाण (वय ४२ रा. नाईकनगर, येरवडा) मोहन बागीवान जाधव (वय ४१ रा. जनवाडी, गोखलेनगर) हबीब इबालु इराणी (वय २३ रा. इराणीवस्ती, शिवाजीनगर) कमल सुभाष चव्हाण (वय ३६ रा. नाईकनगर, येरवडा) अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांनी संबंधितांना तडीपारीचे आदेश दिले आहेत.

१०० हून अधिक गुन्हेगारांवर बारकाईने नजर

परिमंडळ चारच्या हद्दीतील १०० हून अधिक गुन्हेगांरावर बारकाईने नजर ठेवली जात असून, त्यांच्याविरूद्धही लवकरच प्रतिबंधक कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, तडीपार केलेले आरोपी दिसून आल्यास तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. न्यायालयीन अथवा पोलिसांच्या पुर्वपरवानगीशिवाय संबंधित २६ तडीपारांना पुणे शहरात प्रवेश करता येणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×