चंदननगर पोलिसांनी चोरट्याला केली अटक
marathinews24.com
पुणे – घरातील बाथरूमच्या स्वच्छतेच्या कामासाठी आलेल्या कामगाराने तरूणाच्या घरातील सोन्याची चैन चोरून नेल्याची घटना ३ सप्टेंबरला दुपारी साडेतीनच्या सुमारास खराडीतील वेल्सस्टॅड सोसायटीत घडली आहे. याप्रकरणी चोरट्याला चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे. प्रवीण दत्ता जाधव (वय २० रा. सातेसतरा नळी, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी घेतला विसर्जन सोहळा बंदोबस्ताचा आढावा – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार खराडीतील वेल्सस्टॅड सोसायटीत राहायला असून, ३ सप्टेंबरला आरोपी त्यांच्या घरात बाथरूमच्या स्वच्छतेसाठी आला होता. त्यानंतर त्याने घरातील ८० हजारांची सोन्याची चैन चोरून नेली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच, चंदननगर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटविली. त्यानंतर त्याला अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र ढावरे तपास करीत आहेत.























